छोट्या पडद्यावरील ‘दबंग गर्ल’ म्हणून अभिनेत्री कविता कौशिक ओळखली जाते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. नुकताच सोशल मीडियावर काही ट्रोलर्सने कविताला शिवीगाळ करत कमेंट केली होती. पण कविताही शांत बसली नाही तिने ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी त्याच्या कमेंटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
कविताने तिच्या ट्विटर अकाऊंटवर ट्रोलर्सचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हे स्क्रीनशॉट शेअर करत कविताने ‘यांना शोधून काढा, सर्वांसमोर आणा’ असे म्हटले होते. ते पाहून ट्रोलर्सने कविताची माफी मागितली असून ‘मॅडम माफ करा’ असे म्हटले आहे.
कविताने ट्रोलर्सला सुनावले हे पाहून चाहते तिची प्रशंसा करत आहे. तसेच तिला पाठिंबा देखील देताना दिसत आहेत. एता यूजरने कविता कौशिकला म्हटले की, ‘ट्रोल करणारा मुलगा हा शाळेत जाणारा असावा. जाऊ द्या त्याला.’ त्यावर कविताने उत्तर देत ‘आज जर मी त्याला सोडले तर उद्या एखाद्या लहान मुलीला शिवीगाळ करेन. मोठा झाल्यावर तो आजूबाजूच्या मुलींसाठी त्रासदायक ठरु शकतो. आज जर तो सुधारला नाही तर उद्या मोठा होऊन आणखी उद्धटपणे वागेन’ असे कविता म्हणाली.
कविता कौशिक काही दिवसांपूर्वी बिग बॉस १४मध्ये दिसली होती. शोमध्ये तिने अभिनव शुक्लावर अनेक आरोप केले होते. त्या दोघांमधील वाद चर्चेत होता. त्यानंतर कविता आणि एजाज यांच्यामधील भांडण देखील सर्वांनी पाहिली होती.