02 December 2020

News Flash

‘अधीरा’चा नवा अवतार; ‘केजीएफ चॅप्टर – २’ मधील संजयचा लूक आला समोर

बहुचर्चित 'KGF 2'मधील अधीराचा लूक अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

दाक्षिणात्य चित्रपटांमधील सर्वाधिक चर्चेत आणि लोकप्रिय ठरलेला ‘केजीएफ चॅप्टर – १’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून नुकताच त्याचा लूक प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता संजय दत्तचा आज वाढदिवस असल्यामुळे याच दिवशी चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे. या चित्रपटात संजय अधीरा ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे त्याचा लूक समोर आल्यापासून ट्विटरवर संजय दत्त आणि #KGF 2 हे ट्रेण्ड होत आहे. संजयने हा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 11:51 am

Web Title: kgf chapter 2 sanjay dutt adheera look release photo viral ssj 93
Next Stories
1 Viral Video: करोनाची लस सापडत नसल्याने अनुपम खेर रडले
2 रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस करत होते टाळाटाळ- सुशांतचे वकील
3 तापसीसोबत काम करण्यास कंगनाने दिला होता नकार, जाणून घ्या कारण
Just Now!
X