10 July 2020

News Flash

Video : अमृता खानविलकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून आईने लावला डोक्याला हात

अमृता असं काही करेल याची कल्पनाही तिच्या आईला नव्हती

मराठी कलाविश्वातील एनर्जेटिक अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारल्यावर साऱ्यांच्या नजरा अभिनेत्री अमृता खानविलकरकडे वळतात. अमृता मराठी चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूड चित्रपटात झळकली आहे. केवळ चित्रपटचं नाही तर मालिका आणि रिअॅलिटी शोमध्येही तिने तिचा दबदबा निर्माण केला आहे. विशेष म्हणजे सगळ्यांची लाडकी असलेल्या या अभिनेत्रीने मात्र आईच्या जीवाला घोर लावला आहे. सध्या अमृतच्या आईचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांनी अमृताचा स्टंट पाहून डोक्याला हात आवला आहे.

अमृता ‘खतरों के खिलाडी’च्या 10 व्या पर्वात सहभागी झाली आहे. या शोमध्ये सहभागी होणारी अमृता ही मराठी कलाविश्वातील पहिली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची जोरदार चर्चा सुरु आहे.काही दिवसापूर्वीच सुरु झालेल्या या पर्वामध्ये अमृता वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे. मात्र ती ज्या जिद्दीने जीवावर बेतणारे स्टंट करत आहे ते पाहून तिच्या आईने चक्क डोक्याला हात लावल्याचं दिसून येत आहे.

‘खतरों के खिलाडी’चा भाग प्रसारित झाल्यानंतर हा भाग तिच्या आईने पाहिला. या भागात अमृता जीव घेणा स्टंट करत होती. हा स्टंट पाहिल्यावर अमृताची आई थबकून गेली आणि त्यांनी डोक्याला हात लावला. अमृताने तिच्या आईचे हे चेहऱ्यावरील भाग व्हिडीओमध्ये कैद केले असून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वाचा :  टायगरचा ‘हिरोपंती २’ पोस्टर प्रदर्शित होताच वादात; नेटकऱ्यांनी केला हा आरोप

“मी आयुष्यात कधी असं काही करेन याचा विचारही केला नव्हता. मात्र माझा हा स्टंट पाहिल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर जे भाव होते ते पाहिल्यावर तिला नक्कीच माझा अभिमान वाटत असेल असं मला जाणवलं. धर्मेश, जर तू नसतास तर माझं काय झालं असतं”, असं कॅप्शन अमृताने या व्हिडीओला दिलं आहे.

पाहा : Photo : महागुरुंच्या कन्येचा हॉट अवतार!

 दरम्यान, अलिकडेच अमृताचा ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अमृताने राझी, मलंग या चित्रपटात झळकली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 2:46 pm

Web Title: khatron ke khiladi 10 after seen amruta khanvilkar stunt her mothers reaction ssj 93
Next Stories
1 अखेर अण्णांनी माईंसोबत केला रोमान्स; पाहा व्हिडीओ
2 टायगरचा ‘हिरोपंती २’ पोस्टर प्रदर्शित होताच वादात; नेटकऱ्यांनी केला हा आरोप
3 बिग बींनी दिल्या मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा; झाले ट्रोल
Just Now!
X