News Flash

‘द कपिल शर्मा शो’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; कृष्णा अभिषेकचे शोमध्ये पुनरागमन ?

शोमधल्या एपिसोडची क्लिप सोशल मिडियावर शेअर करून दिले संकेत

रसिकांना खळखळून हसवणारा आणि त्यांचं तुफान मनोरंजन करणारा शो म्हणजे सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा शो’. या शोमध्ये कपिल शर्मासोबत इतर कलाकारांसोबत लागोपाठ खटके उडत असल्यामुळे अखेर हा शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हा शो जुलैमध्ये पुन्हा सुरू होणार असून मोठा धमाका करणार आहे. कारण कपिल शर्मा पुन्हा आपल्या जुन्या कलाकारांना सोबत घेऊन नव्याने शो सुरू करणार असल्याचं बोललं जातंय. यात सुनिल ग्रोव्हर पाठोपाठ कृष्णा अभिषेकच्या नावावर सुद्धा सध्या चर्चा सुरूय. कारण कृष्णा अभिषेकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत संकेत दिले आहेत.

कृष्णा अभिषेकने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ‘द कपिल शर्मा शो’ मधली सगळ्यात पहिल्या एपिसोडमधील ही छोटीशी क्लिप आहे. ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्यावेळी अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री सारा अली खान आणि रोहित शेट्टी ही मंडळी त्यांच्या ‘सिंबा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. या व्हिडीओमध्ये कृष्णा कपिलसोबत एक जोक सांगताना म्हणतोय, “मला गफूरने सांगितलं होतं…जर मुंबईत टिकायचं असेल तर शेट्टी लोकांसोबत नातं बनवून ठेवा…”, हे ऐकून समोरील प्रेक्षक यावर खळखळून हसताना दिसून आले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “आमचा सगळ्यात पहिला एपिसोड…खूपच उत्साहीत आणि घाबरलो होतो…सगळ्यात आधी एक कोटी दे ना, असं विचारलं होतं….आम्ही लवकरच येतोय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

कृष्णा अभिषेकची ही पोस्ट पाहून तो नव्याने सुरू होणाऱ्या शोसाठी खूपच उत्साहीत झालाय, असं दिसतंय. ‘द कपिल शर्मा शो’ कमबॅक करणार तर आहेच पण सोबत मोठा धमाका करणार असं बोललं जात होतं. त्याची सुरवात झाली आहे. आतापर्यंत जुन्या कलाकारांच्या पुनरागमनामध्ये कृष्णा अभिषेक देखील एन्ट्री करणार, असं बोललं जात होतं. मात्र कृष्णाच्या या पोस्टवरून प्रेक्षकांना यावर खात्री पटली आहे.

कृष्णा अभिषेक पुन्हा एकदा या शोमध्ये दिसणार, हे कळल्यावर सर्व प्रेक्षक आनंदीत झालेले दिसून येत आहे. गेल्याच महिन्यात कृष्णाने आणखी एक व्हिडीओ शेअर करून तो ‘द कपिल शर्मा शो’ ला खूप मिस करतोय, असं सांगितलं होतं.

‘द कपिल शर्मा शो’ लवकरच कमबॅक करणार आहे. तरीही अद्याप टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. सध्या या शोचे जुने एपिसोड दाखवले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 5:55 pm

Web Title: krushna abhishek shared throwback video from the kapil sharma show says we are coming soon prp 93
Next Stories
1 ‘राधे माँ’, यामी गौतमचा लग्नातील ड्रेस पाहून कलाकारांनी उडवली खिल्ली
2 वीर सावरकरांची भूमिका कोण साकारणार? ‘या’ अभिनेत्यांच्या नावांची चर्चा
3 रोहनप्रीतने नेहाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, म्हणाला ‘मी वचन देतो की…’
Just Now!
X