करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात२१ दिवस लॉकडाउन करण्यात आलं आहे.  त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडल्यास जवळपास सगळ्याच क्षेत्रातलं कामकाज बंद आहे. यात कलाविश्वाचादेखील समावेश आहे. अनेक मालिका, चित्रपट यांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सध्या कलाकार मंडळीदेखील घरीच आहेत. या फावल्या वेळात काही सेलिब्रिटी घर काम करत आहेत. तर काही जण त्यांच्या छंद जोपासत आहेत किंवा त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत. विशेष म्हणजे हे सेलिब्रिटी घरात राहून नेमकं काय करतायेत हे व्हिडीओ, फोटोच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत आहे. यामध्येच अभिनेत्री रश्मी देसाईनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती घरात झाडू मारत असून तिला नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.

व्हायरल होत असलेल्या या  व्हिडीओमध्ये  रश्मी घरात केर काढतांना (झाडू मारताना) दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडविली. घरात काम करताना कोणी मेकअप करतं का?, असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

Clean home #rashmidesai busy during #Lockdown21 . . .#bb13 #biggboss13 #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

रश्मी केर काढत असताना पाठीमागून एक महिला, ‘रश्मी ते वरुनदेखील झाडून घे’, असं सांगते. या महिलेचा आवाज ऐकल्यानंतर रश्मी पाठीमागे वळून बघते. यावेळी रश्मीने मेकअप केल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी रश्मीला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

‘घरात राहून कोणी मेकअप करतं का?’, असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे. तर ‘घरातली कामे करताना पांढरे कपडे घातले आहेत?’,असं अन्य एका नेटकऱ्याने विचारलं आहे. इतकंच नाही तर ‘आतापर्यंत मेकअप करुन केर काढल्याचं पाहायला मिळालं नव्हतं’, असं काही जणांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आतापर्यंत अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते घरात बसून काय करतायेत हे सांगितलं आहे. केवळ छोटा पडदाच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील व्हिडीओ शेअर करत या दिवसांमध्ये काय करतायेत हे सांगितलंय. यात अभिनेता कार्तिक आर्यन,कतरिना कैफ या कालाकारांचा समावेश आहे.