News Flash

‘चोली के पिछे क्या है’ गाण्याचा ‘तो’ व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित आणि सुभाष घई भावूक

'खलनायक'च्या सेटवरील 'चोली के पिछे क्या है' गाण्याच्या मेकिंगचा व्हिडीओ

(Photo- Instagram@madhuridixitnene)

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दीवाने ३’ या शोमध्ये जजच्या भूमिकेत स्पर्धकांना प्रोस्ताहन देत आहे. या शोमध्ये कायमच वेगवेगळे पाहूणे येऊन स्पर्धकांचं मनोबल वाढवत असतात तसचं स्पर्धकांच्या डान्सचं कौतुक करताना दिसतात. या शोमध्ये लोकप्रिय फिल्म मेकर सुभाष घई यांनी गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. हा स्पेशल भाग सुभाष घई यांना डेडिकेट करण्यात आला होता.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत या खास एपिसोडची झलक चाहत्यांसोबत शेअर केली. माधुरीने शेअर केलेल्या व्हिडीओत ती सुभाष घई यांच्यासोबत ‘खलनायक’ या सिनेमातील ‘चोली के पिछे क्या है’ या गाण्याचा BTS व्हिडीओ म्हणजेच सेटवरील पडद्यामागचा व्हिडीओ पाहताना दिसतेय.

हे देखील वाचा: ४० वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर नीना गुप्ता यांना बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाली !

या बीटीएस व्हिडीओत १९९३ सालात लोकप्रिय ठरलेल्या ‘खलनायक’ सिनेमातील गाजलेलं गाणं ‘चोली के पिछे क्या है’चं शूटिंग सुरू असल्याचं दिसतंय. यात सुभाष घई कॅमेरासमोर माधुरीने कसं परफॉर्म करणं अपेक्षित आहे हे सांगत आहेत. तर दिवंगत कोरिओग्राफर सरोज खान माधुरीला डान्सचे धडे देताना दिसत आहेत. सरोज खान मोठ्या एनर्जीने डान्स स्टेप करत माधुरीला त्या स्टेपस् समजावताना दिसत आहेत. तर सुभाष घई देखील अध्ये मध्ये सरोज खान यांच्यासोबत डान्सचा ठेका धरताना दिसत आहेत. या व्हिडीओतील सरोज खान यांचा उत्साह पाहून सुभाष घई आणि माधुरी दीक्षितने टाळ्या वाजवल्या. तर सरोज खान यांना पाहून दोघंही भावूक झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

हे देखील वाचा: ‘तारक मेहता…’ मध्ये दयाबेन साकारणाच्या चर्चांवर दिव्यांकाने सोडलं मौन, म्हणाली.. “हा शो खूपच…”

१९९३ सालातील हा व्हिडीओ पाहून माधुरी दीक्षित आणि सुभाष घई काही काळासाठी भूतकाळात रमले.  माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओल अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अंकिता लोखंडे तसचं टायगर श्रॉफने कमेंट करत पसंती दिली आहे. माधुरीच्या या गाण्याने त्या काळी अनेकांना घायाळ केलं होतं.

दरम्यान या खास एपिसोडमध्ये माधुरी दीक्षितने सुभाष घई यांच्यासोबत केलेल्या अनेक सिनेमांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 5:58 pm

Web Title: madhuri dixit and subhash ghai watching bts video choli ke piche kya hai from khalnayk on dance deewane set kpw 89
Next Stories
1 ‘गंगूबाई काठियावाडी’चं शूटिंग पूर्ण, आता संजय लीला भन्साळी त्याच सेटवर सुरू करणार ही वेब सीरीज
2 ‘तारक मेहता…’ मध्ये दयाबेन साकारणाच्या चर्चांवर दिव्यांकाने सोडलं मौन, म्हणाली.. “हा शो खूपच…”
3 दीपिका कक्करच्या प्रेग्नसीवर पती शोएब इब्राहिमने केला मोठा खुलासा