गेल्यावर्षी देखील अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली होती. यात मलाकका अरोराला देखील करोनाचा सामना करावा लागला होता. तब्बल २१ दिवसांनी मलायकाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला. मात्र याकाळात मलायकाला अनेक शारिरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागल्याचं तिने सांगितलं आहे. मलायकाने इन्स्टाग्राम नुकतेच काही फोटो शेअर करत तिच्या करोनानंतरच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

मलायकाने कॅप्शनमध्ये करोनावर मात करताना तिला आलेला अनुभव मांडला आहे. “तुम्ही खूप लकी आहात..तुमच्यासाठी सगळं सोपं गेलं असेल. हे मी नेहमी ऐकते. मी आयुष्यातील अनेक गोष्टींसाठी आभारी आहे मात्र यात नशीबाचा खूप छोटा रोल आहे. शिवाय सोपं तर अजिबात नव्हत. मी ५ सप्टेंबरला करोना पॉझिटिव्ह झाले. हे खूप कठीण होतं. जे कुणी करोनातून बरं होणं सोपं समजतात त्यांची एकतर प्रतिकार शक्ती तरी चांगली आहे किंवा त्यांना करोनाच्या परिणामांची कल्पना नाही. मी यातून गेले आहे आणि जे अजिबात सोपं नव्हतं.” असं मलायका म्हणाली.

आणखी वाचा: अजय देवगणने खरेदी केला आलिशान बंगला ; बिग बींच्या नव्या घराहून दुप्पट किंमत!

दोन पावलं चालणंही झालं होतं कठीण
“करोनामुळे मी  खूप कमकुवत झाले होते. दोन पावलं चालणही मला मोठं काम वाटू लागलं होतं. फक्त बेडवरून उठणं किंवा खिडकीजवळ जाणं देखील मला मोठा प्रवास वाटू लागला. माझं वजन वाढलं होतं, मला अशक्तपणा आला होता. माझ्यात त्राण उरलं नव्हत. मी माझ्या कुटुंबापासून दूर होते.” असं म्हणत मलायकाने करोना काळात तिने कोणत्या समस्यांचा सामना केला हे सांगितलंय.

२६ एप्रिलला मलायकाचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. यावेळी आनंद झाला असला तर शरीरात थकवा कायम असल्याचं मलायका म्हणाली. तसचं ती पुन्हा कधी फिट होईल हा प्रश्न तिला सतावत असल्याचं ती म्हणाली आहे.

आणखी वाचा: ‘या’ कारणासाठी माधुरी दीक्षित आणि जूही चावलाने कोणत्याही सुपरस्टारसोबत लग्न केलं नाही!

सर्व काही ठीक होईल या आशेने मला बळ दिल.

करोनावर मात केल्यानंतर पुन्हा फिटनेसकडे वळताना मलायकाने कोणत्या गोष्टींचा सामना केला हे देखील तिने सांगितलं आहे. “माझं पहिलं वर्कआउट खूप खतरनाक होतं. मी काहीच नीट करू शकत नव्हते. मी पूर्णपणे खचले होते. मात्र दुसऱ्या दिवशी स्वत:ला समजावलं. मी ठरवलं की मी पुन्हा पहिल्या सारखी बनेन. मग तीसरा. चौथा पाचवा असे अनेक दिवस गेले. अखेर आता मला पहिल्या सारखं वाटू लागलं आहे. एका शब्दाने मला कायम प्रेरणा दिली तो म्हणजे ‘आशा’ , सर्व काही ठीक होईल या आशेने मला बळ दिल.” असं म्हणत मलायकाने त्याला तिला कायम सोबत देणाऱ्या अनेकांचे आभार मानले आहेत. तसचं जगावर आलेलं हे संकट लवकर दूर होवो अशी प्रार्थना तिने केलीय.