20 September 2020

News Flash

ट्रेलरही प्रदर्शित झाला, तरी कामाचे पैसे मिळाले नाही, ‘मणिकर्णिका’ चित्रपटातील अभिनेत्याची नाराजी

या चित्रपटात अँडी ब्रिटीश अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या कामासाठी त्याला देण्यात आलेल्या मानधनाची अर्धी रक्कम निर्मात्यानं थकवली आहे.

या चित्रपटात अँडी ब्रिटीश अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.

‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँशी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चित्रपटाच्या निर्मितीत काहीना काही अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून चित्रपटासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पैसे न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. हा वाद ताजा असताना या चित्रपटात काम करणारा अभिनेता अँडी वॉन इचनंही संपूर्ण मानधन न मिळाल्यानं आपली नाराजी ट्विटरवर व्यक्त केली आहे.

या चित्रपटात अँडी ब्रिटीश अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ‘मणिकर्णिका..’ चा भव्य दिव्य ट्रेलर लाँचचा सोहळा मुंबईत पार पडल्यानंतर अँडीनं ट्विट करत मानधन न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे, तरीही मला माझ्या कामाचे पूर्ण पैसे अद्यापही मिळालेले नाही. कंगना राणोतला हे माहीत असेल असं मला वाटत नाही. मला माझे पैसे मिळण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे, असं तो ट्विटमध्ये म्हणाला आहे. मात्र ट्विट केल्यानंतर काही तासातच या जर्मन अभिनेत्यानं आपलं ट्विट डिलीट केलं आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्यांवर  जवळपास १.५ कोटी रुपये थकविल्याचा आरोप क्रू मेंबर्सनी केला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून चित्रपटासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पैसे अद्यापही दिले नसून ज्यूनिअर कलाकारांचेही २५ लाख रूपये देणे बाकी असल्याचे, वेस्टर्न इंडियाच्या सिने कर्माचाऱ्यांच्या संघाने म्हटलं आहे. ऑक्टोबरपर्यंत पैसे मिळणं अपेक्षित होते. मात्र ते अद्यापही मिळालेले नाही. हा वादा ताजा असताना आता अँडी इचच्या ट्विटनं निर्मात्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी या वादावर बोलताना कंगनानं आपली नाराजी व्यक्त केली होती. ‘चित्रपटासाठी काम करणाऱ्या लहानातल्या लहान व्यक्तींचे पैसे थकवणं देखील चुकीचं आहे. हा अन्याय आहे. जर असं घडलं असेल तर मी स्वत: क्रू मेंबरच्या पाठीशी उभी राहिल. या चित्रपटासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीचे पैसे जरी थकले असतील तरही मी चित्रपटाचं प्रमोशन करणार नाही’ असं म्हणत कंगानानं आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता अँडीच्या ट्विटवर कंगना काय स्पष्टीकरण देते हे पाहण्यासारखं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 12:12 pm

Web Title: manikarnika the queen of jhansi actor andy von eich express his disappointment over non payment dues
Next Stories
1 अक्षय, करण, अजयनं पंतप्रधान मोदींपुढे मांडल्या चित्रपटसृष्टीतील समस्या
2 लक्ष्मीच्या जीवनावर आधारित चित्रपटात दीपिकासोबत प्रमुख भूमिकेत झळकणार विक्रांत !
3 मुख्यमंत्र्यांच्या सततच्या आश्वासनाला मी कंटाळले आहे, सायरा बानोंनी मोदींकडे मागितली मदत
Just Now!
X