विविध मालिका आणि वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या अभिनेता सुयश टिळकने आता एक नवी मोहिम सुरु केली आहे. मोहिम सुरु केली आहे, असं म्हणण्यापेक्षा सुयशने एका चांगल्या उपक्रमात सहभागी होत इतरांनाही या अनोख्या उपक्रमाचा भाग होण्याचं आव्हान त्याने केलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यनातून सुयशने प्लास्टिक वापरावर बंदी घातली असून यापुढे तो शक्य त्या सर्व परिंनी दैनंदिन आयुष्यात प्लास्टिकचा वापर टाळणार आहे. किंबहुना सुयशने याची सुरुवातही केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडिओला #beatplasticpollution असं कॅप्शन देत सुयशने हे पाऊल उचललं आहे.

Monsoon Trekking : ट्रेकिंगला जाताय, ‘या’ गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा

प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषण आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रणात आणता येईल, हे सुयशने या व्हिडीओत सांगितलं आहे. चाहत्यांसोबतच त्याने एका अभिनेत्यालाही हे आव्हान केलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने उललेल्या या अनोख्या आणि मोठ्या मोलाच्या उपक्रमात सहभागी होण्याचं आव्हान त्याने सिद्धार्थ चांदेकरला केलं आहे. तेव्हा आता सुयशने केलेलं हे आव्हान सिद्धार्थ स्वीकारतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यावरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे संदेश आणि उपक्रम राबवण्यासाठी सेलिब्रिटी मंडळीही पुढे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुमच्याही डोक्यात पर्यावरणस्नेही अशी कोणती कल्पना असेल, तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.