कॉलेज आठवणींचा कोलाज : सुयोग गोऱ्हे, अभिनेता

मी होमियोपॅथी फिजिशियन आहे. अकरावी बारावी आर.वाय. के. कॉलेजमधून केलं. तर मेडिकलसाठी मोतीवाला होमियोपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये मी दाखल झालो. दोन्ही कॉलेजच्या माझ्या प्रचंड आणि इतर कलाकारांपेक्षा अतिशय वेगळ्या आठवणी आहेत. ‘आर.वाय.के.’ला असल्यापासूनच मला अभिनयाची वाट खुणावत होती. पण काही कारणास्तव मी मेडिकलला वळालो. मला इतरांसारखा कट्टय़ावर बसायला फार काही वेळ मिळाला नाही. पण आम्ही मेडिकलचे विद्यार्थी असल्याने मानवी मृतदेहांवर अनेक प्रयोग केले आहेत.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे दोन्हीही प्रसंग माझ्या दोन्ही कॉलेजच्या वास्तूत घडले आहेत. आर.वाय.के.ला असताना मी सिद्धार्थ चांदेकरच्या एका चित्रपटासाठी स्पॉट बॉयच काम केल होत. कालांतराने त्याच्याचबरोबर बसस्टॉप या चित्रपटासाठी मी स्क्रीन शेयर केली. तर मेडिकलला असताना आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कोल्हापूरच्या एका चित्रपटाच चित्रीकरण सुरू होत. मिलिंद गवळी त्या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका साकारत होते. त्या चित्रीकरणातून मला या क्षेत्रात यायला प्रचंड ऊर्जा मिळाली. तेव्हापासून मेडिकल कॉलेजमध्ये मी फार सांस्कृतिक चळवळी घडवायला सुरुवात केली.

वेगवेगळ्या विषयांवरच्या स्किट्स शोधून काढून त्या बसवणे, नृत्य स्पर्धा, स्नेहसंमेलन वगैरे गोष्टींत मी अभ्यास संभाळून अग्रेसर असायचो. मेडिकल कॉलेजमध्ये असताना फार नाही, पण चवीची खवय्येगिरी केली आहे. कॉलेजच्या बाजूलाच नाशिकची वैभव असलेली साधना चुलीवरची मिसळ होती. तिथे मी आठवडय़ातून एकदा तरी जायचोच. सोबतच नाशिकची फारशी परिचित नसलेली पण चविष्ट अशी दूध-शेव भाजीसुद्धा मी आवर्जून खायचो. आता चित्रीकरणाच्या निमित्ताने माझी फार भटकंती होत असते, पण दूध-शेव भाजी हा प्रकार मी इतर ठिकाणी कुठे पाहिलेला किंवा ऐकलेला नाही.

कॉलेजमध्ये असताना मी फार रावडी होतो. मी आणि माझे मित्र बाईक आणि कार स्टंटससाठी सर्वश्रुत होतो. एकदा माझा स्टंट माझ्याच जिवावर बेतणारा होता. मी पडता पडता वाचलो. तेव्हा मी मृत्यू खूप जवळून अनुभवला तेव्हापासून कानाला खडा लावला. तेव्हापासून आतापर्यंत मी एकही स्टंट केलेला नाही. मेडिकल कॉलेजमध्ये असताना मी मारामारी किंवा दंगा वगैरे अजिबात केला नाही. उलट मारामारी करून घायाळ झालेली लोक ठणठणीत करण्याचे टास्क आम्हाला असायचे. एकदा मला आठवतंय, माझ्या मित्राच्या घरी चोर घुसला होता. तेव्हा त्या चोराला पकडून आम्ही मित्रांनी त्याला फार कुदवला होता.

आर.वाय.के. कॉलेजचा पहिला दिवस फार मजामस्ती करण्यात गेला. पण मेडिकल कॉलेजचा पहिला दिवस, बापरे! ही एवढी जड पुस्तक आणि एवढा अभ्यास करायचाय आपल्याला हा विचार करण्यात गेला. मेडिकल कॉलेजचा शेवटच्या दिवशी मात्र मी सुटकेचा नि:श्वास सोडला. डॉक्टरची पदवी हातात घेऊन मी आता अभिनय करायला मोकळा, अशा वेगळ्याच मन:स्थितीतून मी आनंदाने बाहेर पडलो.

शब्दांकन : मितेश रतिश जोशी