News Flash

VIDEO : सायबर क्राइमच्या सत्य घटनांवर आधारित ‘टेक केअर गुड नाइट’

यामध्ये सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'टेक केअर गुड नाइट'

सायबर क्राइमवर भाष्य करणाऱ्या आगामी ‘टेक केअर गुड नाइट’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. सत्य घटनांवर आधारित हा चित्रपट आहे.

हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील वडिलांना बदलत्या तंत्रज्ञानाचे धडे घेत तंत्रज्ञानाबद्दलचे त्यांचे अज्ञान दूर करून घ्यावे लागते. आपल्या समुपदेशन कौशल्यावर बसलेली धूळ पुसत त्याचा वापर यातील आईला याकामी करून घ्यावा लागतो. आपल्या आई वडीलांबरोबरचा संवादाचा तुटलेला धागा यातील मुलीला पुन्हा जोडावा लागतो. कथेमध्ये मग या सर्व गोष्टी पुढे येतातच पण त्याचबरोबर आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूही उलगडत जातात.

वाचा : बिकीनीतल्या फोटोमुळे सारा खान ट्रोल; नेटकऱ्यांनी दिला धर्म बदलण्याचा सल्ला

गिरीश जयंत जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. ‘टेक केअर गुड नाईट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 5:33 pm

Web Title: marathi movie take care good night trailed released sachin khedekar mahesh manjrekar
Next Stories
1 बिकीनीतल्या फोटोमुळे सारा खान ट्रोल; नेटकऱ्यांनी दिला धर्म बदलण्याचा सल्ला
2 ..अन् हुमा कुरेशी अचानक ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ शो सोडून गेली
3 Web Series : एका प्रेमळ जोडप्याची कथा घेऊन येत आहे ‘द गुड व्हाइब्ज’
Just Now!
X