News Flash

झी मराठीवरील बाजी मालिकेत येणार नवा ट्विस्ट!

पेशवाई कालखंडाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतला खलनायक सध्या चर्चेत आहे.

शेरा, बाजी मालिका

झी मराठीवरील लोकप्रिय ठरत असलेली मालिका बाजी सध्या एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत दाखविण्यात येणारा प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून आता या मालिकेमध्ये आणखी एक ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बाजी’ या मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा त्याचं दुसरं रूप घेऊन पुण्यात परत शिरला आहे. तो आता कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापाऱ्याचं सोंग घेऊन परत आला असून मराठी साम्राज्याला पुन्हा एकदा त्याच्या विषारी नजरेला सामोरं जावं लागणार आहे.

पेशवाई कालखंडाच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतला खलनायक सध्या चर्चेत आहे. म्हातारा बनून वेगवेगळी कट कारस्थानं रचून पेशवाईत हैदोस घालण्याच्या इराद्यानं शिरला होता. पुण्याच्या कोतवालीतला प्रामाणिक शिलेदार बाजी यानं त्याला मारलं. पण तो खरच मेला आहे की जिवंत आहे,हे एक रहस्य आहे. त्याचा मृत्य झाला नसेल तर नेमकं त्याने काय घडवून आणलं हा ही एक उत्सुकतेचा विषय आहे. ऐतिहासिक घटनांचे संदर्भ घेत लिहिली गेलेली बाजी ही एक रहस्य कथा आहे,निजामाच्या कारस्थानाचा भाग म्हणून शेरा पेशवाई खळखिळी करण्यासाठी शेरा पुण्यात आला आहे.

तो केव्हा काय करेल याचा अंदाज बांधता येत नाही,अभिनेते प्रखर सिंग यांनी ही भूमिका साकरली असून त्याच्या अभिनय शैलीची आणि संवादाची खूप प्रशंसा होत आहे.या पात्राच्या तोंडी असलेल्या “हिंदुस्थान की राजनीती का दिमाग है शनिवारवाडा और हिंदुस्थान की खूबसुरती का दिल

बावनखनी” अशा संवादांनी हे पात्र अधिक रंगतदार झालंआहे. या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं असून झी मराठीवर ही मलिका सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेदहा वाजता प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 11:21 am

Web Title: marathi serial baji shera in pune
Next Stories
1 माझ्या सर्व चित्रपटांवर बंदी आणा- ट्विंकल खन्ना
2 मेगन- प्रिन्स हॅरीसारखंच प्रियांका-निकचंही ‘रॉयल’ फोटोशूट
3 Happy Birthday Atul Kulkarni : ‘मी प्रेमात कसा पडलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे’
Just Now!
X