फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने JNU चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली आहे. बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) उमर खालिदला अटक करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईवर अभिनेता जिशान अय्यूब याने नाराजी व्यक्त केली आहे. “या देशात अल्पसंख्यांक असणं गुन्हा आहे” असं म्हणत त्याने उमर खालिदच्या अटकेचा विरोध केला आहे.

अवश्य पाहा – कंगना हिमाचलला परतली, जाता जाता पुन्हा मुंबईबद्दल बोलली

जिशान अय्यूब सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो राखठोकपणे आपली मतं मांडतो. यावेळी त्याने उमर खालिदच्या अटकेवरुन संताप व्यक्त केला आहे. “होय, या देशात अल्पसंख्यांक असणं एक गुन्हा आहे. खरं बोलणं हा त्याही पेक्षा मोठा गुन्हा आहे. शिवाय संविधान आणि अहिंसेबाबत बोललं तर तुम्हाला फाशी दिली जाऊ शकते. उद्या तुमच्याही घरातील व्यक्तीला पकडतील. राजकिय ताकतीचा हा गैरवापर आहे.” अशा आशयाचं ट्विट जिशानने केलं आहे. या ट्विटद्वारे त्याने उमर खलीदला पाठिंबा दिला आहे.

अवश्य पाहा – “अंकितावर आरोप करुन प्रसिद्धीचा प्रयत्न सुरु”; शिबानीच्या टीकेवर अपर्णाचं प्रत्युत्तर

इंडियन एक्स्प्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी उमर खालिदला चौकशीसाठी बोलवले होते. रविवारी लोदी कॉलनीमध्ये त्याला विशेष सेल कार्यालयात तपासासाठी सहभागी होण्यास सांगितलं. त्यानंतर रविवारी तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला दिल्ली पोलिसांनी अटक केली.