मराठी नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये विविध भूमिका करून आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘देऊन बंद’ या चित्रपटात ते अक्कलकोटचे ‘श्री स्वामी समर्थ’ महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मराठीसह मोहन जोशी यांनी हिंदीतील काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. चरित्र, खलनायक, विनोदी अशा विविध प्रकारच्या भूमिका करणाऱ्या मोहन जोशी यांच्या आजवरच्या अभिनय कारकीर्दीपेक्षा एकदम वेगळी भूमिका या निमित्ताने ते साकारत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे व प्रणीत कुलकर्णी यांचे आहे.
श्री स्वामी समर्थ सेवामार्ग केंद्राच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
पुढील महिन्यात ३१ तारखेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात श्वेता शिंदे, गिरिजा जोशी, विभावरी देशपांडे आदी कलाकार आहेत. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा या चित्रपटात काम करतो आहे. त्याचाही हा पहिलाच चित्रपट आहे.
यापूर्वी स्वामी समर्थ यांच्या जीवनावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दाजी भाटवडेकर यांनी स्वामी समर्थाची भूमिका केली होती. तर ई टीव्ही मराठी (आत्ताची कलर्स मराठी)वर काही वर्षांपूर्वी स्वामी समर्थाच्या जीवनावरील ‘कृपासिंधू’ही मालिका प्रसारित झाली होती. या मालिकेत अभिनेते प्रफुल्ल सामंत यांनी स्वामींची भूमिका केली होती. आता लोकप्रिय अभिनेते मोहन जोशी स्वामी समर्थाची भूमिका करत असून ते या भूमिकेत कसे दिसतात आणि वावरतात याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
निवेदिता जोशी-सराफ पुन्हा मोठय़ा पडद्यावर
अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ दीर्घ कालावधीनंतर ‘देऊळ बंद’ या मराठी चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट