बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर बॉलिवूडमध्ये तिचं नशीब आजमावत आहे. ‘तूफान’ सिनेमातील मृणालची भूमिका फारशी मोठी नसली तरी तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. या सिनेमानंतर मृणाल शाहिद कपूरसोबत ‘जर्सी’ या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमादेखील खेळावर म्हणजेच क्रिकेटवर आधारित आहे.
नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत मृणालने ती क्रिडाप्रेमी असल्याचा उल्लेख केला होता. “मला खेळांची आवड असून मी शालेय दिवसांमध्ये बास्केटबॉल खेळायचे. अनेक झोनल मॅचमध्ये देखील मी सहभाग घेतला होता. त्यानंतर मी फुटबॉल खेळणं देखील सुरु केलं होतं. कोणताही खेळ खेळण्यासाठी मी कायम तयार असायचे.” असं मृणाल म्हणाली.
हे देखील वाचा: जय भानुशालीने ‘तो’ फोटो शेअर केल्याने पत्नी माही नाराज, सोशल मीडियावर केलं ब्लॉक
पुढे मृणालने ती क्रिकेटप्रेमी असल्याचं सांगत असतानाच एका क्रिकेटरच्या प्रेमात ती अक्षरश: वेडी असल्याचा खुलासा तिने केला. मृणाल म्हणाली, “माझा भाऊ मोठा क्रिकेटप्रेमी आहे. भावामुळेच मलाही क्रिकेट आवडू लागलं. एकवेळ अशी होती की मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते.” असं म्हणत मृणालने ती विराटची मोठी चाहती असल्याचं सांगितलं.
View this post on Instagram
पुढे मृणाल म्हणाली, “पाच वर्षांपूर्वी मी माझ्या भावासोबत स्टेडियममध्ये लाइव्ह मॅच पाहण्यास गेले होते. त्यावेळीच्या अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोर आजही तरळतात.मला लक्षात आहे की मी निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. योगायोगाने आता मी जर्सी सिनेमात काम करतेय. जो क्रिकेटवर आधारित आहे.” असं मृणाल म्हणाली.
यासोबत लवकरच मृणाल ठाकूर आदित्य रॉय कपूरसोबत थडम या तामिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे.