‘युट्यूब’ आणि ‘टिक-टॉक’ हे इंटरनेटवर सध्या सर्वाधिक वापरले जाणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. जगभरातील कोट्यवधी लोक या प्लॅटफॉर्म्सचा वापर मनोरंजनासाठी करतात. परंतु या दोघांमधील श्रेष्ठ कोण? असा एक नवा वाद सोशल मीडियावर सुरु झाला आहे. या वादात आता शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी देखील उडी घेतली आहे. टिक-टॉक नावाच्या चीनी विषाणूला दूर फेका अशी विनंती त्यांनी देशवासीयांना केली आहे.
हे फोटो पाहाच – काय म्हणावं हिला चिकन तंदुरी की वडापाव?; रिहानाची तुलना खाद्य पदार्थांशी
मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी टिक-टॉक निशाणा साधला आहे. “टिक-टॉक हे रिमाकटेकड्या लोकांचं काम आहे. हा वाया गेलेल्या लोकांचा अड्डा आहे. आयुष्यात करण्यासारखं खुप काही आहे त्यामुळे टिक-टॉकवर आपला बहुमुल्य वेळ वाया घालवू नका. हे चीनी अॅप आहे, जे आपल्या तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेत आहे. या अॅपचा वापर त्वरीत बंद करा.” अशा आशयाचे वक्तव्य मुकेश खन्ना यांनी या व्हिडीओमध्ये केले आहे.
अवश्य वाचा – अनिल कपूर यांनी नकार देणाऱ्या दिग्दर्शकाकडेच मागितला ऑटोग्राफ; कारण…
सोशल मीडियावर सध्या ‘युट्यूब’ विरुद्ध ‘टिक-टॉक’ असा वाद सुरु आहे. नेटकरी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुकेश खन्ना यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.