News Flash

‘नागिन २’मधील ही अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ

'वारिस' मालिकेच्या सेटवर या दोघांची भेट झाली.

(सांकेतिक छायाचित्र)

‘ससुराल सिमर का’ आणि ‘नागिन २’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विंध्या तिवारी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेता नील मोटवानीसोबत विंध्या लग्नगाठ बांधणार असून सोशल मीडियावर नीलने ही आनंदाची बातमी दिली.

‘ये है मोहब्बतें’ आणि ‘वारिस’ यांसारख्या मालिकांमध्ये नीलने भूमिका साकारली आहे. ‘वारिस’ मालिकेच्या सेटवर या दोघांची भेट झाली. दोघांमधील मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. नील- विंध्याच्या लग्नाची तारिख अद्याप ठरली नसून डिसेंबरमध्ये रोका पार पडणार असल्याचं समजतंय.

वाचा : ‘महिला मंडल’मध्ये अक्षय कुमार; विद्या बालन देणार साथ

टेलिव्हिजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध रिअॅलिटी शो स्टार प्रिंस नरुला आणि अभिनेत्री युविका चौधरी विवाहबंधनात अडकले. ‘बिग बॉस-९’ या रिअॅलिटी शोदरम्यान प्रिंस आणि युविकाची जोडी चांगलीच चर्चेत होती. त्यानंतर या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:57 pm

Web Title: naagin 2 actress vindhya tiwary is all set to tie the knot with actor neel motwani
Next Stories
1 #MeToo : ‘सेक्रेड गेम्स’च्या अभिनेत्रीचा दिग्दर्शक विपुल शहावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप
2 #MeToo : दिग्दर्शक मुकेश छाबडाला दणका, फॉक्स स्टारकडून करार रद्द
3 दिग्दर्शकाने सांगितलं रेप सीनमध्ये बिनधास्त जबरदस्ती करा, दलिप ताहिल यांचा धक्कादायक खुलासा
Just Now!
X