News Flash

‘तारक मेहता..’मध्ये लवकरच नट्टू काकांचं कमबॅक; ‘या’ दिवशी होणार मालिकेत एण्ट्री

प्रकृती खालावल्यामुळे घनश्याम नायक यांनी घेतला होता मालिकेतून ब्रेक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. उत्तम अभिनयशैली आणि प्रेक्षकांना खळखळून हसविण्याची कसब या मालिकेतील कलाकारांमध्ये आहे. त्यामुळे ही मालक आज टीआरपीमध्येदेखील प्रथम स्थानावर असल्याचं दिसून येतं. जेठालाल, दयाबेन या पात्रांप्रमाणेच या मालिकेतील गाजलेलं एक पात्र म्हणजे नट्टू काका. सेठजी मेरा पगार कब बढाओगे असा प्रश्न विचारणारे नट्टू काका लवकरच मालिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहेत.

काही दिवसांपूर्वी नट्टू काका म्हणजेच अभिनेता घनश्याम नायक यांच्यावर सर्जरी झाली होती. त्यामुळे त्यांनी काही काळासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ते पूर्णपणे बरे झाले असून लवकरच तारक मेहताच्या सेटवर परतणार आहेत.

दरम्यान, नवरात्रीनंतर प्रदर्शित होणाऱ्या भागामध्ये नट्टू काका दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नट्टू काका ही तारक मेहता मधील गाजलेली भूमिका आहे. सतत जेठालालकडे पगार वाढीची मागणी करमाऱ्या नट्टू काकांची स्टाइल प्रचंड फेमस झाली आहे. घनश्याम नायक यांनी तारक मेहतापूर्वी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘तेरे नाम’, ‘बरसात’, ‘खाकी’, ‘चायना गेट’, ‘हम दिल हे चुके सनम’, ‘तिरंगा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात ते झळकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:48 pm

Web Title: nattu kaka will join shooting of taarak mehta ka ooltah chashmah serial after navratri ssj 93
Next Stories
1 मनिषा कोईरालाला करोनाची लागण?; चाहत्यांच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं उत्तर
2 “इतकी विशाल कंपनी अन्…”; त्या जाहिरातीमुळे स्वरा भास्कर ‘तनिष्क’वर नाराज
3 योग करताना हत्तीवरुन पडले रामदेवबाबा; व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर फराह खान म्हणाली…
Just Now!
X