News Flash

Indian Idol मधून हा स्पर्धक आऊट झाल्यामुळे दुःखी झाली बिग बींची नात नव्या…

सवाईच्या एल‍िमिनेशननंतर नव्या खूपच दुःखी झालीय. इन्स्टाग्रामवर सवाईचा एक फोटो शेअर केलाय. यासोबत तिने रडणाऱ्या इमोजी आणि हार्ट ब्रेकच्या इमोटीकॉन शेअर केलेत.

इंड‍ियन आइडल 12 मधून गेल्या एपिसोडमध्ये सवाई भट्ट हा स्पर्धक आऊट झालाय. शो मधून त्याचं बाहेर जाणं हे सर्वांसाठीच शॉकिंग होतं. सवाई भट्ट हा फक्त इंड‍ियन आइडल 12 च्या प्रेक्षकांचाच नव्हे तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदेली हिचा सुद्धा आवडता स्पर्धक होता. काही दिवसांपूर्वीच नव्याने सवाई भट्टला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर त्याच्या एल‍िमिनेशनवर नव्याने आपली प्रतिक्रिया दिलीय.

सवाईच्या एल‍िमिनेशननंतर नव्या खूपच दुःखी झालीय. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सवाईचा एक फोटो शेअर केलाय. यासोबत तिने रडणाऱ्या इमोजी आणि हार्ट ब्रेकच्या इमोटीकॉन शेअर केले आहेत. तसंच सवाईला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी प्रोत्साहन देखील केलंय. “गात रहा, चमकत रहा…”, असं तिने यात लिहिलंय. नव्याने लिहिलेले हे शब्द सवाईसाठी खूप मोलाचे आहेत.

sawai-bhatt-navya-naveli-indian-idol

या गाण्याने नव्याचं मन जिंकलं

नव्या नवेलीनं नुकतंच सवाई भट्टच्या एका गाण्याचं खूप कौतुक केलं होतं. तिने इंड‍ियन आइडल शोच्या एका एपिसोडमधला सवाई भट्ट आणि उद‍ित नारायण यांचा फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत तिने हॅंड ओवेशनची इमोजी सुद्धा शेअर केली होती. सवाईने गायलेल्या एका गाण्याने नव्या नवेलीचं मन जिंकलं होतं. ‘उड जा काले कांवा’ हे ते गाणं असून यात सवाईने त्याच्या मधूर आवाजाने फक्त नव्याच नाही तर सर्वच प्रेक्षक वर्ग प्रभावित झाले होते.

सवाईने सर्वांचे आभार मानले

सवाईने त्याच्या एलिमिनेशननंतर शोमधील प्रवासाबाबत जनतेचे आभार मानले. त्याने लिहिलं, “नमस्कार मित्रांनो, आम्ही सगळे जण हिमेश सरांचं गाणं गाणार आहोत, खूप मजा येणारेय…तुम्ही सर्व जण त्यांना आशिर्वाद द्या…आणि आम्हाला ही द्या…कारण तुम्ही जितकं जास्त प्रेम करता तितका जास्त आशिर्वाद मिळतो आम्हाला…”. चॅनलने सुद्धा ट्विट करत सवाई भट्टला सन्मानित केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 10:16 pm

Web Title: navya naveli has this to say her favourite indian idol contestant sawai bhatt on elimination prp 93
Next Stories
1 Video: मुलीने ‘सेक्स’ आणि ‘प्रेग्नंसी’वरून प्रश्न विचारल्यानंतर पिता अनुराग कश्यप म्हणाला…
2 कृतिका गायकवाडचे मुंबईच्या ऐतिहासिक स्थळांवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ निमित्त फोटोशूट!
3 अमिताभ बच्चन यांच्या ‘गुडबाय’मधल्या को-स्टारला पाहिलंत का? बिग बी म्हणाले, “परफेक्ट को-स्टार”
Just Now!
X