चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या उत्तम अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. परंतु, यावेळी चर्चा आहे ती त्याच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओची. गायक कैलाश खैरच्या या म्युझिक व्हिडिओमध्ये नवाजुद्दीनबरोबर २०१३ ची मिस इंडिया अर्थ सोभिता धुलिपालादेखील आहे. कैलाश खेरच्या आवाजातील ‘इश्क अनोखा’ या गाण्याचे बोल आणि संगीतदेखील कैलाशचेच आहे. ‘सारेगम म्युझिक कंपनी’द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अल्बममध्ये एकूण नऊ गाणी आहेत. ‘इश्क अनोख’ हा कैलासचा पाचवा अल्बम आहे. याआधीच्या त्याच्या चार अल्बमप्रमाणे या अल्बममधील गाणीदेखील श्रोत्यांना पसंतीस उतरत असल्याचे दिसत आहे. ‘इश्क अनोख’ गीताचा व्हिडिओ यू ट्युबवर उपलब्ध असून, आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Apr 2016 रोजी प्रकाशित
नवाजुद्दीन सिद्दीकीचा पहिला म्युझिक व्हिडिओ ‘इश्क अनोखा’
कैलाश खेरच्या आवाजातील 'इश्क अनोखा' या गाण्याचे बोल आणि संगीतदेखील कैलाशचेच आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 06-04-2016 at 13:15 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nawazuddin siddiqui in kailash khers music video ishq anokha