मराठीत कोणता तरी मोठा चित्रपट प्रदर्शित व्हावा, अशी आस मनी बाळगून असलेल्या रसिकांसाठी आत्तापर्यंत हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाच कानावर पडत होत्या. आता येईल… उद्या येईल करत अखेर काही दिग्दर्शकांनी एप्रिल-मे महिन्यांत आपल्या मराठी चित्रपटांच्या तारखा जाहीर के ल्या आहेत. आताची करोनारुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे टाळेबंदीची टांगती तलवार पुन्हा सगळ्यांच्याच डोक्यावर आली असल्याने ठरवल्याप्रमाणे चित्रपट प्रदर्शित होऊ शकतील की नाही, अशी नवीच चिंता त्यांना सतावू लागली आहे. पण हा सगळा नंतरचा विचार… सध्या तरी आपण किती तयारीत आहोत याची चाचपणी के ली पाहिजे आणि निर्धाराने आपला चित्रपट घेऊन मैदानात उतरलं पाहिजे, असा आग्रह दिग्दर्शक के दार शिंदे धरताना दिसतात. तब्बल तीन वर्षांनंतर के दार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ हा नवीन चित्रपट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

गेल्या सोळा वर्षांत ‘अगं बाई अरेच्चा’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘खो खो’, ‘ऑन ड्युटी २४ तास’, ‘अगं बाई अरेच्चा २’सारखे जेवढे चित्रपट केले. त्या प्रत्येक चित्रपटातून काही वेगळं देण्याचा प्रयत्न मी करत आलो आहे. त्यामुळे आता काही नवीन विषय असेल तरच मला चित्रपट करायचा होता आणि ती इच्छा वैशाली नाईक या लेखिके ने पूर्ण के ली. त्यांनी त्यांची कथा ऐकवली तेव्हाच या विषयावर चित्रपट करायचा असं मी ठरवून टाकलं होतं, असं के दार सांगतात. ‘बाईपण भारी देवा’ हे चित्रपटाचं नाव ऐकलं की साहजिकच ‘अगं बाई अरेच्चा’ या केदार यांच्या पहिल्या चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मला बाईचं मन चांगलं समजतं हे आत्ता प्रेक्षकांच्याही लक्षात आलं आहे. त्यामुळे स्त्री किं वा नायिकाप्रधान विषयावरची वेगळी कथा सांगणारा चित्रपट असेल तर तो करायला मलाही उत्साह वाटतो, असे ते सांगतात. याही चित्रपटात ‘बाई’ के ंद्रस्थानी आहे. एका अर्थी कोणत्याही कलाकृतीला पुढे घेऊन जाणारी बाईच असते, असं मला वाटतं. म्हणजे घर असो वा बाहेरचं जग असो तीच सूत्रं हातात घेऊन हा गाडा हाकत असते. त्यामुळे तिचं के ंद्रस्थानी असणं हे स्वाभाविक आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही तिची वेगळी गोष्ट पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच चित्रपटाच्या कथेबद्दलचा तपशील उलगडण्यासाठी अंमळ वाट पाहावी लागेल, असं त्यांनी सांगितलं.

अर्थात, चित्रपटाविषयी फार काही आत्ताच सांगता न येण्यामागेही सध्याची परिस्थिती कारणीभूत असल्याचं ते सांगतात. आम्ही मे महिन्यात तारीख जाहीर के ली आहे, मात्र खरोखरच त्या तारखेला चित्रपट प्रदर्शित होईल की नाही याबद्दल साशंकता आहेच. कालपरवापर्यंत सगळं सुरळीत सुरू होतं, मात्र आज ते तितकं च सरळ सुरू आहे असं नाही. परिस्थिती सारखी बदलते आहे, तरीही आम्ही तारीख जाहीर के ली, कारण आमची मे महिन्यात अमुक तारखेला चित्रपट प्रदर्शित करायची तयारी आहे हे इतर निर्माता-दिग्दर्शकांना कळेल आणि ते त्यांच्या चित्रपट प्रदर्शनाचं नियोजन करू शकतील, नाही तर एकाच वेळी तीन-चार मराठी चित्रपट प्रदर्शित होतात आणि आपापसात काहीच समन्वय नसल्याची ओरड होऊ लागते, असं ते सांगतात; पण पुढच्या काही महिन्यांत तीन ते चार मराठी चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित करावे लागतील याचीही तयारी निर्मात्यांनी ठेवली पाहिजे, असं ते सांगतात. अजूनही गेल्या वर्षीचे चित्रपट प्रदर्शित होऊ शकलेले नाहीत. ‘बाईपण भारी देवा’चं चित्रीकरण गेल्या वर्षी फे ब्रुवारीत सुरू के लं होतं. राहिलेलं चित्रीकरण आम्ही सप्टेंबरमध्ये जेव्हा पुन्हा चित्रीकरणाला परवानगी मिळाली तेव्हाच पूर्ण के लं, अशी माहिती त्यांनी दिली. शेवटी प्रत्येकाची चित्रपटातील आर्थिक गुंतवणूक अडकू न पडली आहे, त्यामुळे लवकरात लवकर चित्रपट प्रदर्शित करण्याशिवाय निर्मात्यांसमोर पर्यायही उरला नसल्याचे त्यांनी स्पष्ट के लं.

टाळेबंदीच्या काळात काळात माझे दोन चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शनासाठी तयार झाले आहेत. शिवाय, याच काळात मी दूरचित्रवाणीसाठी ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिके चा विषय हातात घेतला, आता ती रोज सुरू आहे. हिंदीतही ‘सोनी टीव्ही’वर ‘सरगम की साडेसाती’ ही माझी हिंदी मालिका सुरू आहे आणि त्याचे काम रोजच्या रोज पाहावे लागते. त्यामुळे हातातल्या या गोष्टी पूर्ण होईपर्यंत नवं काही आत्ताच सुरू करणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. लोकांना घरातून बाहेर पडून चित्रपटगृहापर्यंत येण्याची सवय लागली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त चित्रपट प्रदर्शित करणं हीच गरज आहे. त्यामुळे ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट लोकांसमोर आणणं यासाठीच धडपड असेल, असंही त्यांनी स्पष्ट के लं.

टाळेबंदीच्या काळात अनेक लेखक-दिग्दर्शकांनी नव्या संहिता लेखनापासून चित्रपटाच्या तयारीपर्यंत अनेक गोष्टी के ल्या. मी मात्र टाळेबंदीत काही फार सर्जनशील करू शकलो नाही. त्या काळात वेळ भरपूर होता, मात्र वातावरण आणि विचार फार अस्थिर होते. मी एक कलाकार आहे, मी आजूबाजूच्या परिस्थितीवर माझ्या कलाकृतीतून विनोदी भाष्य करत आलो आहे. त्यामुळे मी या समाजाचा एक घटक आहे आणि इथे काही तरी जळत असताना मी घरात बसून शांतपणे लिहितो आहे हे मला शक्य झालं नाही. त्यातून अशा परिस्थितीत विनोद करणंही शक्य नाही. त्यामुळे नवीन काही के लं नसलं तरी याच काळात माझे दोन चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शनासाठी तयार झाले आहेत. लोकांना घरातून बाहेर पडून चित्रपटगृहापर्यंत येण्याची सवय लागली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त चित्रपट प्रदर्शित करणं हीच गरज आहे. त्यामुळे ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट लोकांसमोर आणणं यासाठीच धडपड असेल.

केदार शिंदे