25 February 2021

News Flash

Video : ‘नेहू दा व्याह’ प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा, नेहा-रोहनची रोमॅण्ट्रिक केमिस्ट्री

पाहा, नेहाने शेअर केलेला खास व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या २४ ऑक्टोबरला ही जोडी लग्नगाठ बांधणार असून त्यांच्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. नुकताच नेहाचा रोका समारंभ पार पडला. त्यानंतर आता नेहा आणि रोहनचा नेहू दा व्याह हा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे.

सध्या नेहा आणि रोहनचा नेहू दा व्याह हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यात नेहा व रोहनची रोमॅण्ट्रिक केमिस्ट्री दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये या दोघांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नेहा या व्हिडीओ प्रमोशन करताना दिसत होती. तिने या व्हिडीओशी संबंधित अनेक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या होत्या.

दरम्यान, गेल्या कित्येक दिवसापासून सोशल मीडियावर नेहाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, अखेर येत्या २४ ऑक्टोबरला नेहा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तर २६ ऑक्टोबर रोजी पंजाबमध्ये त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 5:33 pm

Web Title: neha kakkar rohanpreet singh most awaited video nehu da vyah release ssj 93
Next Stories
1 सलमान आता क्रिकेटच्या मैदानातही; विकत घेतली टीम
2 ‘विरुष्काच्या बाळाला नेपोकिड म्हणणार का?’ घराणेशाहीच्या वादात साकिब सलीमची उडी
3 मृण्मयी देशपांडेचा ‘बोगदा’ हा चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Just Now!
X