कॉफी आणि बरचं काही, सिध्दांत यासारख्या चित्रपटातून नेहा महाजनच्या अभिनयाचं कौशल्य आपण सगळ्यांनीचं पाहिलं आहे. नेहाच्या अभिनयाचा अजून एक पैलू आपण येऊ घातलेल्या ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटातून अनुभवणार आहोत.
स्वातंत्र्यवीरांच्या बऱ्याच कथा इतिहासात प्रसिध्द आहेत. या वीरांच्या खांद्याला खांदा मिळवून तितक्याचं सफाईदारपणे स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या वीरांगणांची छवी ‘निळकंठ मास्तर’ या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्यासमोर उभी राहणार आहे. नेहा महाजनने स्वातंत्र्यपूर्व काळातल्या अशाच एका वीरांगणेचं व्यक्तीचित्र पडद्यावर साकारलं आहे. स्वातंत्र्याची लढाई लढताना वेळोवेळी करावं लागणारं पलायन, आपली ओळख लपवण्यासाठी केलेलं वेशभूषांतर या पार्श्वभूमीवर नेहाची वेगवेगळी रूप ‘निळकंठ मास्तर’च्या निमित्ताने आपल्यासमोर येणार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ रंगवणाऱ्या या चित्रपटाविषयी बोलताना, ‘खऱ्या अर्थी ग्लॅमरस भूमिका साकारण्याची संधी ‘निळकंठ मास्तर’च्या निमित्ताने मिळाल्याचं’, नेहा आवर्जून सांगते.
गजेंद्र अहिरेंचं दिग्दर्शन आणि अजय-अतुल यांचं संगीत असणारा ‘निळकंठ मास्तर’ येत्या ७ ऑगस्टला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2015 रोजी प्रकाशित
‘वीरांगणा’ नेहा
कॉफी आणि बरचं काही, सिध्दांत यासारख्या चित्रपटातून नेहा महाजनच्या अभिनयाचं कौशल्य आपण सगळ्यांनीचं पाहिलं आहे.

First published on: 27-07-2015 at 02:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neha mahajan in the movie nilkanth master