‘बिग बॉस १२’ च्या घरातून नेहा पेंडसे बाद झाली आहे. विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या स्पर्धकांपैकी नेहा एक होती. सुरूवातीपासूनच स्वत:ला कोणत्याही वादात ओढून न घेता नेहा स्वत:च्या पद्धतीनं हा खेळ खेळत होती. मात्र रविवारी ती ‘बिग बॉस’च्या स्पर्धेतून बाद झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील नेहाची एक्झिट ही अर्थातच तिच्या चाहत्यांसाठी जबरदस्त धक्का मानला जातो.
‘विकेंड का वार’मध्ये अभिनेता करणवीर बोहरा आणि नेहा हे दोघं अंतिम दोन स्पर्धकांमध्ये होते. ‘कालकोठरी’ची शिक्षा गांभिर्यानं न घेतल्यानं नेहा, करणवीर बोहरा आणि श्रीसंतला नॉमीनेट करण्यात आलं होतं. श्रीसंतची रवानगी सिक्रेट रुममध्ये करण्यात आली आहे.
सुरूवातीपासून स्वत:ला कोणत्याही वादात न ओढता सेफ गेम नेहानं खेळला. मराठीत मोठा चाहतावर्ग नेहाचा आहे पण त्याचबरोबर ‘ मे आय कम इ मॅडम’ या विनोदी मालिकेतून तिनं हिंदी प्रेक्षकांमध्येही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. नेहाचा फॅन फॉलोअिंगही मोठा आहे, म्हणूनच नेहाच्या एक्झिटमुळे चाहतेही नाराज आहेत. नेहानं इतरही टास्क गांभिर्यानं खेळत नसल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. नेहाला प्रेक्षकांकडून करणवीरच्या तुलनेत कमी मतं पडली त्यामुळे तिला घरातून बाहेर पडावं लागलं.