सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. त्यामुळेच आतापर्यंत अनेक ऐतिहासिक, राजकीय, पौराणिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यातच ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे.

आगळ्यावेगळ्या नावामुळे चर्चेत असलेल्या ‘८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल १४ नवोदित कलाकार कलाविश्वात पदार्पण करणार आहेत.

कलाविश्वात पदार्पण करणारे नवोदित कलाकार

वैभव महाले, विशाल दुराफे, श्रीशैल शेलार , कृष्णा बोलू, सिद्धार्थ वाघ, विराज तीळेकर, तृप्ती फडतरे, साक्षी थोपटे, अनुष्का पिंपुटकर, अक्षय मिटकल, अक्षय धावडे , अनिकेत पोटे, बालकलाकार रुजूला धोंड, बालकलाकार मयंक हिंगे.

दरम्यान, सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा विकास हांडे, लोकेश मांगडे व सुधीर कोलते यांच्या खांद्यावर आहे. विशेष म्हणजे संजय मोने, आनंद इंगळे, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजशिर्के, शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात झळकणार आहे. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेतून आपल्या भेटीस येणार आहे.