अभिनेत्री निकिता रावलने नुकताच एका भयानक घटनेचा सामना केला आहे. दिल्लीतील शास्त्री नगर परिसरात काही गुंडाने बंदुकीचा धाक दाखवत निकितीकडील जवळपास ७ लाखा रुपयांच्या वस्तू लुटल्या आहेत. काही मास्क घातलेल्या गुंडांनी निकिताचं अपहरण करून तिच्याकडील वस्तू चोरल्या. यावेळी निकिता तिच्या काकूंच्या घरी थांबली होती. या घटनेनंतर निकिता लगेचच दिल्लीहून मुंबईला परतली.
हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत निकिता म्हणाली, “जवळपास १० वाजताची वेळ असेल. मी माझ्या काकूंच्या घरी निघाले होते. तेव्हा एक इनोव्हा कार माझ्या समोर आडवी आली. त्यानंतर गाडीतील ४ मास्क घातलेल्या लोकांनी बंदूकीचा धाक दाखवत माझ्याकडील सर्व वस्तू चोरल्या. या घटनेबद्दल बोलताना मला अजूनही भिती वाटतेय.” या चोरांनी निकिताकडील अंगठी, घड्याळ, कानातले, हिऱ्याचं पेंडेंट आणि काही रोख रक्कम चोरली. या संपूर्ण वस्तूंची किंमत जवळपास ७ लाख रुपये असल्याचं निकिताने सांगितलं आहे.
पुढे निकिता म्हणाली, “त्यावेळी मला वाटलं होतं हे लोक मला जीवे मारतील. त्याहून जास्त भिती होती ती म्हणजे चोरी केल्यानंतर यांनी माझा रेप केला तर…त्या १० मिनिटांमध्ये मी कोणत्या स्थितीचा सामना केला हे शब्दात मांडणं देखील कठिण आहे. या घटनेनंतर मी घरी पोहचले. घरी कुणींच नसल्याने मी स्वत:ला लॉक करून घेतलं. सकाळ होताच मी मुंबईला परतले. कारण तिथे मला सुरक्षित वाटत नव्हतं.”
या घटनेनंतर निकिता मानसिक ताणावाखाली असून तिला झोपदेखील लागत नसल्याचं ती म्हणाली. ही आयुष्यातील सर्वात वाईट घटना असल्याचं निकिता म्हणाली.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
२००७ सालामध्ये निकिताने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. तिने ‘मिस्टर हॉट मिस्टर कूल’, ‘द हिरो अभिमन्यू’ आणि ‘अम्मा की बोली’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसचं निकिता लवकरच ‘रोटी कपडा और रोमान्स’ मध्ये अर्शद वारसी आणि चंकी पांडे सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.