News Flash

अशोक सराफ यांच्या नावामागची कहाणी; पाहा ‘तो’ खास फोटो

अशोक मामा कोणाला गुरू मानतात? निवेदिता सराफ यांची पोस्ट

अशोक सराफ, निवेदिता सराफ

विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसविणारे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आज इंडस्ट्रीमध्ये त्यांना ‘अशोक मामा’ म्हणूनच ओळखलं जातं. पण त्यांच्या नावामागची कहाणी तुम्हाला माहीत आहे का? त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी त्यांच्या नावामागची खरी कहाणी सांगितली आहे. त्याचसोबत एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे.

अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत अशोक सराफ यांचा हा फोटो आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिलं, ‘गुरू-शिष्य…मोठी बहीण विजया अशोक कुमारांची खूप मोठी चाहती..त्यांच्या अभिनयानं ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टानं त्याचं नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडलं. ईश्वरानेही तथास्तु म्हटलं. अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ. चतुरस्त्र अभिनेता आज ७२व्या वर्षीही तितक्याच ताकदीने उत्साहाने ठामपणे उभा आहे आणि अशोककुमारांना गुरू स्थानी मानतो आहे.’

‘विनोदाचा सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. वयाच्या ७२ व्या वर्षीसुद्धा ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘प्रवास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत काम केलं होतं. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर अशोक मामांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 10:51 am

Web Title: nivedita saraf telling story behind the name of ashok saraf ssv 92
Next Stories
1 ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन
2 सोनू सूदच्या मदतकार्यात पत्नीचाही मोलाचा वाटा
3 “नवाजुद्दीनबद्दल अजून बरंच काही उघड व्हायचंय”; पुतणीच्या तक्रारीनंतर पत्नीची प्रतिक्रिया
Just Now!
X