News Flash

Mother’s Day : आईच्या समाजसेवेचे कौतुक करत सोनालीने केले आवाहन

सोनालीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

आज ‘International Mother’s Day’ म्हणजे ‘जागतिक मातृदिन’ त्या निमित्ताने मुलं त्यांच्या आईला शुभेच्छा देत असतात. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने देखील तिच्या आईचा फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका बाजूला सोनालीची आई आणि एका बाजूला सोनाली असल्याचे दिसतं आहे. सोनाली आणि तिच्या आईने सेम पोज दिली आहे. हा फोटो शेअर करत “आपल्यापैकी बरेच लोक आपल्या आई, आजी आणि पणजी आजीसारखे दिसतात…आपल्यामध्ये त्यांचा अंश हा सामावलेला असतो!”

पुढे ती म्हणाली, “या मदर्स डे ला मी ते काम करणार आहे जे माझी आई अतिशय उत्तम करत आली आहे.त्यामुळेच मी कडल्सफाउंडेशनला मदत करत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

पुढे सोनाली म्हणाली,”ही संस्था कर्करोग झालेल्या मुलांसाठी काम करते. त्यांच्या #JustLikeMa या मोहिमेमध्ये शामील व्हा आणि आपल्या आईच्या सन्मानासाठी देणगी द्या आणि कर्करोगाशी लढणाऱ्या मुलांना विनामूल्य जेवण देण्यात हातभार लावत मदत करा”, अशा आशयाचे कॅप्शन देतं सोनालीने हा फोटो शेअर केला आहे. सोबतच सोनालीने जस्टलाइकमा हे हॅशटॅग वापरले आहे.

आणखी वाचा : छोट्या नवाबचा फोटो शेअर करत करीनाने दिल्या जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा

दरम्यान, करोनाशी लढण्यासाठी सोनाली सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. सोनालीने अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 4:45 pm

Web Title: on mother s day sonali bendre shared a photo of her and her mother and told people to help child fighting cancer dcp 98
Next Stories
1 विराज कुलकर्णीने शेअर केला ‘माझी आई’ निबंधाचा शाळेतील किस्सा
2 सातारा : फलटण येथे हॉस्पिटलमधील वॉर्ड बॉयला अटक; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
3 “स्तनपानाला अद्यापही आपल्याकडे..”; मातृदिनाला अमृता रावने व्यक्त केली खंत
Just Now!
X