गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा संपूर्ण कलाविश्वाला लागून राहिली होती, तो ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकता लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. मुख्य सोहळा रंगण्यापूर्वीच ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा उत्साह ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. यंदाच्या ऑस्करमध्ये हार्वी विनस्टीनविरोधात अनेकांनीच आवाज उठवत लैंगिक शोषणाविरोधात आपली ठाम भूमिका मांडली. अभिनेत्री अॅशली जड आणि मिरा सोर्विनो या दोघींनी सुरुवातीपासूनच ‘टाईम्स अप’चा म्हणत सर्वांचं लक्ष वेधलं. तर ज्येष्ठ अभिनेत्री रिटा मोरेनो यांनी ५६ वर्षांपूर्वीचा ड्रेस घालत ऑस्करच्या रेड कार्पेटची शान वाढवली.

रेड कार्पेटच्या झगमगाटानंतर लोकप्रिय सूत्रसंचलक जिम्मी किम्मेलनं ऑस्करच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात केली. जिम्मीने नेहमीप्रमाणेच सद्यस्थितीला सुरु असणाऱ्या काही मुद्द्यावर उपरोधिक टीका करत कार्यक्रम पुढे नेला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात तब्बल १३ नामांकनं मिळवणाऱ्या ‘द शेप ऑफ वॉटर’ या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासह या चित्रपटाच्या खात्यात एकूण चार पुरस्कारांची नोंद झाली आहे. त्याशिवाय ‘कोको’ आणि ‘डंकर्क’ या चित्रपटांनाही यंदाच्या ऑस्करने गौरवण्यात आलं. ९० व्या ऑस्कर सोहळ्यात ‘द पोस्ट’ या चित्रपटासाठी अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना पुरस्कार मिळेल अशी अनेकांचीच अपेक्षा होती पण, त्यांना शह देत फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) या अभिनेत्रीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला.

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा

*यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटसाठीच्या ऑस्करवर कोरलं गेलं ‘द शेप ऑफ वॉटर’चं नाव

*९० व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

*आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट हावर)ला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानाचा ऑस्कर

*सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा यंदाचा ऑस्कर पुरस्कार ‘शेप ऑफ वॉटर’च्या खात्यात.

*ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली

*सर्वोत्कृष्ट संगीत- रिमेंमबर मी (कोको)

*सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत विभागातील पुरस्कारावर कोरलं गेलं ‘शेप ऑफ वॉटर’चं नाव. अलेक्झँडर डेस्प्लॅट यांनी मानले सर्वांचे आभार

*केआला सेटलच्या परफॉर्मन्सला कलाकारांनी दिलं स्टँडिंग ओव्हेशन

*सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठीचा मानाचा ऑस्कर ‘ब्लेड रनर 2049’या चित्रपटाच्या खात्यात

*सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) या ऑस्कर पुरस्कारावर कोरलं गेलं जॉर्डन पीलेचं नाव. ‘गेट आउट’ चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार

*सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)- ‘कॉल मी बॉय युवर नेम’, जेन्म आयव्हरीचा पहिला ऑस्कर पुरस्कार

*लैंगिक शोषणाविरोधात ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये कलाकारांनी उठवला आवाज, म्हणाले ‘टाईम्स अप’

*सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्टचा ऑस्कर ‘द सायलंट चाइल्ड’च्या खात्यात

*सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्रीसाठीचा पुरस्कार ‘हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द 405’

*चाहत्यांना जिम्मी किम्मेलने दिलं सरप्राईज. चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांची भेट घेत त्यांना दिला आश्चर्याचा धक्का.

*’डंकर्क’साठी ली स्मिथने स्वीकारला सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर

*सर्वोत्कृष्ट वीएफएक्ससाठीचा ऑस्कर ‘ब्लेड रनर 2049’च्या खात्यात

*सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट- कोको.

*सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट- डियर बास्केटबॉल

*सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून ऑस्करवर कोरलं गेलं अॅलिसन जेनीचं नाव, चित्रपट (आय, टोन्या)

*सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटासाठीचा ऑस्कर ‘अ फॅन्टॅस्टिक वुमन’च्या खात्यात

*पुरस्कार प्रदान करतेवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या बंद पाकिटांवर पुरस्कार विभागांची नावं मोठ्या आणि ठळक अक्षरांमध्ये लिहिण्यात आली आहेत.

 

*सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन- शेप ऑफ वॉटर

*जिम्मी किम्मेलच्या खुमासदार सूत्रसंचालन शैलीने उपस्थितांची मनं जिंकली

*साऊंड एडिटिंगमागोमाग सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंगच्या ऑस्करवर ‘डंकर्क’चं नाव

*सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंगचा ऑस्कर ‘डंकर्क’ चित्रपटाच्या खात्यात.

*सर्वोत्कृष्ट माहितीपट (फिचर)- इकॅरस

*सर्वोत्कृष्ट वेशभूषा- ‘फँटम थ्रेड’

*सर्वोत्कृष्ट मेकअप आणि केशभूषेचा ऑस्कर ‘डार्केस्ट हावर’ चित्रपटाच्या खात्यात

*अभिनेता सॅम रॉकवेलला मिळाला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा ऑस्कर (थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड एबिंग, मिझूरी)

*’थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड एबिंग, मिझूरी’च्या खात्यात पहिला ऑस्कर

*रेड कार्पेटवर हार्वी विनस्टीनपासून ते इतरही बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर सेलिब्रिटी आपली मतं मांडत आहेत.

*’गेट आऊट’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन मिळालेला अभिनेता डॅनिअल कालुया

*डॉल्बी थिएटरमध्ये कलाकारांची गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर पुरस्कार सोहळ्यासाठीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

*ऑस्करच्या रेड कार्पेटवर येणं हेच माझ्यासाठी ऑस्कर जिंकण्याइतकंच महत्त्वाचं- जॉर्डन पीले (दिग्दर्शक- गेट आऊट)

*सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीसाठीचं नामांकन मिळालेली अभिनेत्री अॅलिसन जेनी रेड कार्पेटवर आली आणि सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या