28 November 2020

News Flash

सलमानची ही हिरोईन होती प्रभासची क्रश, ‘या’ चित्रपटात साकारणार आईची भूमिका

जाणून घ्या या अभिनेत्री विषयी...

‘बाहुबली’ या चित्रपटातून खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे प्रभास. आज त्याचे लाखो चाहते आहेत. पण अनेक तरुणींच्या मनावर जादू करणाऱ्या प्रभासचे कोणत्या अभिनेत्रीवर क्रश असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आता प्रभास आणि ती अभिनेत्री एकत्र काम करणार आहेत. पण या चित्रपटात ही अभिनेत्री प्रभासच्या आईची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.

‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री ही प्रभासची क्रश होती. ते दोघे आता ‘राधे श्याम’ या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. त्यानिमित्ताने भाग्यश्रीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने प्रभाससोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

भाग्यश्रीचा ‘मैंने प्यार किया’ चित्रपट पाहिल्यावर प्रभासला तिचा अभिनय आवडला होता. आता ‘राधे श्याम’ या चित्रपटात त्याला त्याच्या क्रशसोबत काम करायला मिळाल्यामुळे तो आनंदी असल्याचे भाग्यश्रीने पुढे सांगितले आहे.

‘राधे श्याम’ या चित्रपटात पूजा आणि प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सथ्यन हे कलाकार देखील दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तामिळ आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 3:39 pm

Web Title: prabhas has crush on bhagyashree working with her in radhey shyam avb 95
Next Stories
1 Video : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेविषयी ‘त्या’ वक्तव्याबद्दल अलका कुबल यांनी मागितली माफी
2 पवित्रा-एजाजचं नातं म्हणजे…; काम्या पंजाबी संतापली
3 कविता कौशिक बिग बॉसमधून बाहेर; पण…
Just Now!
X