News Flash

RRR सोबतच प्रभासच्या ‘राधे श्याम’चे दुसरे पोस्टर प्रदर्शित

हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार...

(Photo credit : Prabhas instagram and RRR movie instagram)

दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास त्याचा आगामी चित्रपट ‘राधे श्याम’मुळे चर्चेत आहे. प्रभासचे चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, उगाडीच्या निमित्ताने प्रभासच्या या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

प्रभासने ‘राधे श्याम’चे पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये प्रभास रेट्रो अंदाजात दिसत आहे. प्रभासने सहा भाषांमध्ये सहा पोस्टर शेअर केले आहेत. “या सुंदर सणांच्या उत्सवांचे एक बंधनकारक घटक म्हणजे प्रेम. त्याचा अनुभव. त्याची कदर करा. तुम्हाला सगळ्यांना उगडी, गुढीपाडवा, बैसाखी, विशु, पुथांडू, जुर सीतल, चेती चंद, बोहाग बिहू, नवरेह आणि पोला बोशकच्या हार्दिक शुभेच्छा,” असे कॅप्शन प्रभासने ते पोस्टर शेअर करत दिले आहे.

प्रभासने फक्त दक्षिणात्य नाही तर संपूर्ण भारतात असलेल्या त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभासची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. हे पोस्टर शेअर केल्यानंतर थोड्याच वेळात त्याला ७ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

दरम्यान, ‘राधे श्याम’ या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना प्रभास आणि पूजामध्ये रोमान्स पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने फक्त प्रभासने त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले नाही तर, RRR चित्रपटाच्या निर्मात्यांनी देखील त्यांच्या चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 4:17 pm

Web Title: prabhas new movie radhe shyam s new poster released dcp 98
Next Stories
1 “कोणत्या झोपडपट्टीतून आणलंय मुलीला?”,असं म्हणणाऱ्यांना मंदिराने फटकारलं!
2 “जगात करोना तर आमच्यासाठी करोना आणि करीनासुद्धा!” – आमीर खान
3 महिलेने तोंडाऐवजी केसाला लावले मास्क, अभिनेत्रीने शेअर केला फोटो
Just Now!
X