News Flash

माझ्यासाठी आत्महत्या ही हत्येपेक्षा मोठी चिंता- प्रसून जोशी

एम्स रुग्णालयातील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला असून त्या रिपोर्टमध्ये सुशांतच्या हत्येचा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला आहे.

प्रसून जोशी

“आत्महत्या हा एक आजार असून माझ्यासाठी हत्येपेक्षा मोठी चिंता ही आत्महत्या आहे”, असं वक्तव्य प्रसिद्ध लेखक प्रसून जोशी यांनी केलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर त्यांनी पहिल्यांदाच आपलं मत व्यक्त केलं. दरम्यान, एम्स रुग्णालयातील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला असून त्या रिपोर्टमध्ये सुशांतच्या हत्येचा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असल्याचं सांगितलं आहे.

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसून जोशी म्हणाले, “माझ्यासाठी आत्महत्या हा हत्येपेक्षा मोठा चिंतेचा विषय आहे. कारण हत्या प्रकरणात दोषी कोण आहे हे समजतं. पण आत्महत्या हा आजार आहे. या आजाराशी लोक झुंज देऊ शकत नाहीयेत. ते असुरक्षित आहेत. ही कोणती छोटी गोष्ट नाही. इंडस्ट्रीने या विषयाकडे गंभीररित्या पाहणं गरजेचं आहे. फक्त हिट चित्रपटांची निर्मिती करणं एवढचं इंडस्ट्रीचं काम नाही. आयुष्य हे चित्रपटांपेक्षा फार मोठं आणि महत्त्वाचं आहे.”

सुशांतच्या आत्महत्येवर एम्सकडून शिक्कामोर्तब

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 8:54 am

Web Title: prasoon joshi breaks silence on sushant singh rajput death says suicide is a bigger concern than murder ssv 92
Next Stories
1 चित्रचाहूल : उत्कंठावर्धक आठवडा..
2 ‘बेलबॉटम’चे चित्रीकरण पूर्ण
3 ‘लेखकांना महत्त्व द्यायला हवं’
Just Now!
X