बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. प्रियांका तिच्या हटके स्टाईमुळे ओळखली जाते. तिच्या प्रत्येक लूकची चर्चा होते. तिच्या लूक्समुळे कधी लोक तिची स्तुती करतात तर कधी तिला ट्रोल करतात. मात्र, प्रियांका कधीच या सगळ्याकडे लक्ष देत नाही. प्रियांकाने नुकतीच BAFTAमध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी तिने परिधान केलेल्या जॅकेटमुळे ती ट्रोल झाली आहे.
‘ब्रिटीश अकॅडमी फिल्म अवॉर्ड’ म्हणजेच BAFTA हा लोकप्रिय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याचं हे ७२ वे वर्ष होते. या पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. इथेच प्रियांका आणि तिचा पती निक जोनसदेखील उपस्थित होते. प्रियांकाने यावेळी गुलाबी रंगाचे नक्षीदार जॅकेट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. या कपड्यांमध्ये प्रियांका खरी देसी गर्ल दिसत आहे. प्रियांकाच्या या फोटोला ६ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.
View this post on Instagram
मात्र, अनेकांनी प्रियांकाला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘अंतर्वस्त्र परिधान करायला विसरली’. तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आपली संस्कृती आणि परंपरा विसरू नकोस.’ मात्र, प्रियांका या ट्रोल्सकडे लक्ष देत नाही. प्रियांकाने या पुरस्कार सोहळ्यात आणखी एक ड्रेस परिधान केला होता. त्यात तिने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. प्रियांकाचे या सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही फोटोंमध्ये प्रियांकासोबत निक जोनस देखील दिसत आहे.
View this post on Instagram

दरम्यान, प्रियांकाने काही दिवसांपूर्वी न्युयॉर्कमध्ये भारतीय रेस्टॉरंट सुद्धा सुरु केलं आहे. त्याचे नाव ‘सोना’ असे ठेवण्यात आले आहे. या रेस्टॉरंटमध्ये प्रियांकाचे आवडीचे सगळे पदार्थ उपलब्ध आहेत.
