27 February 2021

News Flash

रेस ३ : ‘या’ नव्या गाण्याला २४ तासातच मिळाले लाखो व्ह्युज

आतापर्यंत या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत.

रेस ३

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याच्या आगामी ‘रेस ३’ या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या चित्रपटातील तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत. या गाण्यांमध्ये ‘सेल्फिश’ आणि  ‘अल्लाह दुहाई है’ या गाण्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मात्र त्या मानाने ‘हीरिए’ या गाण्याला कमी प्रतिसाद मिळाला. या तीनही गाण्यांपैकी एका गाण्याला कमी कालावधीत जास्त व्ह्युज मिळाल्याचे दिसून आले.

‘हीरिए’ आणि ‘ सेल्फिश’ या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असला तरी या गाण्यांव्यतिरिक्त ‘अल्लाह दुहाई है’ या गाण्याला अवघ्या २४ तासामध्ये ४० लाख व्ह्युज मिळाले आहेत. ‘हीरिए’ आणि ‘सेल्फिश’ या गाण्यांना आतापर्यंत अनेक व्ह्युज जरी मिळाले असले तरी ‘अल्लाह दुहाई  है’ या गाण्याला २४ तासामध्ये सर्वात जास्त व्ह्युज मिळाल्याचे दिसून आले.

allah duhaai hai अल्लाह दुहाई है

‘अल्लाह दुहाई है’ हे गाणं शुक्रवारी प्रदर्शित झालं असून युट्युबवर हे गाणं तिस-या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. एकाच दिवसात या गाण्याला एवढं व्ह्युज मिळत असून या व्ह्युजर्सची संख्या वाढताना दिसत आहे.

‘रेस ३’ मधील यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हीरिए’ आणि ‘सेल्फिश’ या गाण्यांना जरी प्रेक्षकांनी पसंती दिली असली तरी ‘अल्लाह दुहाई है’ हे गाणं प्रेक्षकांना विशेष भावलं आहे. आतिफ अस्लम आणि युलिया वंतूर यांनी गायलेलं ‘सेल्फिश’ या गाण्याला युट्युबरवर आतापर्यंत २ कोटी ६० लाख व्ह्युज मिळाले असले तरी ‘अल्लाह दुहाई है’ या गाण्याला एकाच दिवसात ४० लाख व्ह्युजर्स मिळणं ही चित्रपटाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.  प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा याचा ‘रेस ३’ हा चित्रपट येत्या १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 11:06 am

Web Title: race 3 song trending on youtube
Next Stories
1 video: ‘रेस ३’ मधील तिसरं गाणं ऐकलंत का ?
2 गोविंदा माझे आयडॉल! व्हायरल झालेल्या डान्सर काकांची प्रतिक्रिया
3 जाणून घ्या प्रेक्षकांना कसा वाटला ‘भावेश जोशी’
Just Now!
X