अभिनेत्री रायमा सेनच्या बॉलिवूडमधील करिअरला २० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून रायमचा बदललेला अंदाज पाहायला मिळतोय. रायम सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच रायमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टॉपलेस फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून या फोटोंमुळे रायमा चांगलीच चर्चेत आली होती. मात्र या फोटोंमुळे आपल्या प्रतिमेवर काही परिणाम होईल किंवा आयुष्यात काही परिणाम होतील यांची मी पर्वा केली नाही असं रायमा सेन म्हणाली.
‘आयएएनएस’ला दिलेल्या एका मुलाखतीत रायमा म्हणाली, “माझ्या प्रतिमेची मला अजिबात चिंता नाही. मी इन्स्टाग्रामसाठी फोटोशूट केलं होतं. मी ज्या भूमिकांसाठी पात्र आहे अशा भूमिका मला अजूनही मिळतील. मी माझं स्थान निर्माण केलं आहे. मला वाटतं नाही कुणी मला टाइपकास्ट करेल.”
पुढे रायमा म्हणाली, ” या फोटोशूटमुळे आता मला फक्त बोल्ड भूमिका मिळतील असं अजिबात नाही. फोटोशूट करताना असा विचारही डोक्यात नव्हता. लॉकडाउन होतं आणि काहीच करण्यासाठी नसल्याने हे फोटोशूट केलं. चाहत्यांसमोर एका वेगळ्या अंदाजात यावं असं मला वाटल्याने मी हे फोटोशूट केलं. कदाचित उद्या मी पारंपरिक वेशभूषेत फोटोशूट करेन. मला वाटतं या गोष्टींनी काही फरक पडत नाही.” असं म्हणत रायमाने तिच्या टॉपलेस फोटोशूटचं कारण स्पष्ट केलंय.
View this post on Instagram
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत फोटोशूटबद्दल सांगताना रायमा म्हणाली, “या फोटोशूट दरम्यान मी स्वत: अगदी कम्फर्टेबल होते. तसचं हे फोटो इतकेही ग्लॅमरस नाहीत. शिवाय मी लाजाळू वैगरे तर अजिबात नाही.”
रायमा सेन ही अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी आहे. ‘गॉडफादर’ या सिनेमातून रायमाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. रायमा नुकतीच ‘द लास्ट अवर’ या वेब सीरिजमध्ये झळकली होती.