28 September 2020

News Flash

हृतिक आणि कंगनाबद्दलचे सत्य जाणून अनेकांना धक्काच बसेल- राकेश रोशन

हृतिक इतरांपेक्षा वेगळा आहे.

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडची ‘क्वीन’ कंगना आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यामध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ आहे. एका विवादास्पद विधानाने या दोन कलाकारांमध्ये उडालेली ही ठिणगी थेट कोर्टकचेऱ्यांपर्यंत पोहोचली आणि या दोन्ही कलाकारांनी अप्रत्यक्षपणे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याच्या बातम्यांना हवा मिळत गेली. त्यामुळे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या या दोन्ही कलाकारांना या प्रकरणी वारंवार माध्यमांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी ‘या’ प्रकरणी माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे म्हणत कंगनाने केलेल्या एका विधानावरुन अनेक चर्चांना उधाण आले होते.

दरम्यान एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हृतिकचे वडिल आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन यांनी आपले मत मांडले आहे. या मुलाखतीमध्ये कंगना आणि हृतिकच्या वादाविषयी राकेश रोशन यांना प्रश्न विचारला असता ‘हृतिक इतरांपेक्षा वेगळा आहे. बहुधा त्याच्याविषयी कोणी जेव्हा उगाचच अफवांचा बाजार उठवतं तेव्हा तो शांत राहण्यास प्राधान्य देतो. जर त्याने याविषयीचे सत्य उघड केले तर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसू शकेल’, असे राकेश रोशन म्हणाले. यापुढे हृतिक सध्या त्याच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे, असे सांगत ‘कामातून मोकळे होताच तो या प्रकरणी बोलेल’ असेही राकेश रोशन म्हणाले. सध्या हृतिक ‘काबिल’ या चित्रपटामध्ये व्यस्त असून राकेश रोशन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यासोबतच राकेश रोशन ‘क्रिश’ चित्रपटाच्या सिरीजमधील चौथा चित्रपट काढण्याच्या तयारीत असून २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

हृतिक आणि कंगनाच्या या वादाला त्यावेळी सुरुवात झाली होती, जेव्हा एका मुलाखतीमध्ये कंगनाने हृतिकला तिचा प्रियकर (एक्स बॉयफ्रेण्ड) म्हणून उल्लेखले होते. कालांतराने या वादाच्या ठिणगीला आणखीनच हवा मिळत गेली आणि या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 2:55 pm

Web Title: rakesh roshan speaks on kangana ranaut if hrithik speak truth it will shock
Next Stories
1 रेल्वे प्रवासात उंदीर ठरला अभिनेत्री निवेदिता सराफांची डोकेदुखी
2 ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नव्या पात्राची एण्ट्री..
3 Katrina Kaif: कतरिना झाली ‘कतरिना कैफ कपूर’!
Just Now!
X