News Flash

..म्हणून चाहत्यांपासून दूर जाणार रणबीर कपूर

रणबीरच्या चाहत्यांसाठी काहीशी निराशाजनक बातमी

रणबीर कपूर

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामुळे अभिनेता रणबीर कपूरच्या अभिनय कारकिर्दीला चांगलीच कलाटणी मिळाली आहे असेच म्हणावे लागेल. पण या चित्रपटाला मिळालेल्या यशा नंतर रणबीर काही काळासाठी त्याच्या चाहत्यांपासून दूर जाणार आहे. काही काळासाठी रणबीर ‘अंडरग्राऊंड’ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रणबीरच्या चाहत्यांसाठी ही काहीशी निराशाजनक बातमी असली तरीही त्याच्या दृष्टीने मात्र ही फार महत्त्वाची बाब आहे.

संजय दत्तच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटामध्ये रणबीर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे हे तर सर्वचजण जाणतात. राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनात बनणाऱ्या या चित्रपटामध्ये रणबीर कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येणाऱ्या काळात लवकरच रणबीरच्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार असून सध्या या चित्रपटाच्या निर्मितीविषयी चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याच चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर काही काळासाठी सर्वांच्याच नजरेआड जाणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरला एका वेगळ्याच लूकमध्ये दाखवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या चित्रपटातील रणबीरच्या लूकबाबत सध्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक जास्तच सावधगिरी बाळगत आहेत. रणबीरचा आगळावेगळा लूक पाहून प्रेक्षकही थक्क झाले पाहिजेत असा या चित्रपटांच्या दिग्दर्शकांचा मानस असल्याची माहितीसुद्धा सूत्रांनी दिली आहे.

रणबीरला या भूमिकेसाठी काही ताकिद देण्यात आल्या आहेत. त्याला शक्यतो सार्वजनिक ठीकाणी जाण्याची परवानगीही देण्यात आलेली नाही. तसेच जीवनशैलीमध्येही काही बदल करण्याचा सल्ला रणबीरला देण्यात आला आहे.  त्यामुळे येत्या काळात रणबीर विविध कार्यक्रमांमध्ये दिसला नाही तर चाहत्यांनी वाईच वाटून घेण्याचे काहीच कारण नाही. दरम्यान, रणबीर लवकरच ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचीही चर्चा आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे दोघेही करण जोहरच्या या चॅट शो मध्ये एकत्र हजेरी लावणार असल्याचे कळत आहे. त्यामुळे या दोघांनाही एकत्र पाहण्याची मजा काही औरच असेल यात शंकाच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:06 am

Web Title: ranbir kapoor advised to keep low profile for sanjay datt bayopic
Next Stories
1 BLOG : यश नेमके कशात? आठवड्यात, गल्ल्यात की प्रभावात?
2 सेलिब्रिटी क्रश: ‘त्या’ प्रेमपत्राचे उत्तर आलेच नाही
3 चलनबंदीच्या गोंधळातही मराठी चित्रपटांचे पारडे जड
Just Now!
X