रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपची चर्चा अद्याप सुरुच आहे. ब्रेकअपनंतर या दोघांनाही मानसिक त्रास सोसावा लागत असला तरी याचा मोठा फटका रणबीरलाच पडला आहे.
कतरिनासोबतच्या ब्रेकअपमुळे रणबीरला २१ कोटींचे नुकसान झेलावे लागले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंत बुडालेल्या रणबीर आणि कतरिनाने एकत्र राहायचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी कार्टर रोड स्थित सिल्वर सँड अपार्टमेंटमध्ये पेंटहाऊस भाड्याने घेतले होते. त्याचे महिन्याला भाडे होते १५ लाख आणि यासाठी २१ कोटी रुपये अनामत रक्कम म्हणून द्यावे लागले होते. ही सर्व रक्कम रणबीरने भरली होती. मात्र, घराची लीज संपण्यापूर्वीच या दोघांचे नाते संपुष्टात आले आणि याचा फटका रणबीरला सोसावा लागत आहे.
दरम्यान, रणबीर आणि कतरिना दोघेही ब्रेकअपवर काहीही बोलणे टाळत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2016 रोजी प्रकाशित
कॅटसोबतच्या ब्रेकअपमुळे रणबीरला २१ कोटींचा फटका!
पेंटहाऊस महिन्याला भाडे होते १५ लाख रुपये.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 29-01-2016 at 09:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoors break up with katrina kaif cost him 21 crores