News Flash

“मला तिथे कोणी तरी असल्याचा भास झाला”; रणवीरने सांगितला ‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवरचा भयानक किस्सा

रणवीर सिंहने एका मुलाखतीत 'बाजीराव मस्तानी' सिनेमाच्या सेटवर त्याला भूत दिसल्याचा दाव केला होता.

रणवीर सिंहने आजवर त्याच्या अभिनय कौशल्याने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. बाजीराव आणि अल्लाउद्दीन खिलजी या त्याच्या ऐतिहासिक भूमिकांनी तर त्याने जगभरातील चाहत्यांची पसंती मिळवली आहे. रणवीर सिंहच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमाने तर लोकप्रियतेच्या सर्व सीमा ओलाडंल्या होत्या. या सिनेमातील रणवीरच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. हा सिनेमा रणवीरच्या करिअरमधील मैलाच दगड ठरला. असं असलं तरी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान मात्र रणवीरला काही न विसरता येण्यासारखे अनुभव आले आहेत. जे प्रचंड भयानक असून त्यामुळे रणवीरची देखील चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.

रणवीर सिंहने एका मुलाखतीत ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाच्या सेटवर त्याला भूत दिसल्याचा दाव केला होता. यावेळी तो प्रचंड घाबरला असल्याचं देखील तो म्हणाला. शिवाय ते दुसरं तिसरं कुणी नसून बाजीराव पेशवे यांची आत्मा असल्याचं रणवीर म्हणाला. या सिनेमात दीपिका पादूकोण मस्तानीच्या भूमिकेत झळकली होती.

मी कधीच आत्मा आणि भूत यावर विश्वास ठेवत नव्हतो मात्र…

सिनेमाच्या रिलीजनंतर एका मुलाखतीत रणवीरने या सर्व थरारक अनुभवाचा खुलासा केला होता.”याआधी मी कधीच आत्मा आणि भूत यावर विश्वास ठेवत नव्हतो. मात्र त्या दिवसापासून मी खूप घाबरलो होतो. माझ्यासाठी शूटिंगचे ते सर्वात कठीण दिवस होते. सतत माझ्या आजुबाजूला कुणी तरी असल्याचं मला जाणवत होतं. ते बाजीराव असल्यासारखं मला जाणवतं होतं. मी सतत विचार करत होतो की जर मला खरचं बाजीराव पेशवे यांची आत्मा दिसली तर… मला माहित नाही मी असा विचार का करत होतो..पण काही दिवसातच हे प्रत्यक्षात घडलं. माझ्या कानात कुणीतरी मी तोच (बाजीराव) आहे असं कुजबुजल्याचं मला जाणवलं” असं रणवीर म्हणाला.

ranveer-singh-deepika-paukone-bajirao-mastani (photo-indian express)

पहा व्हिडीओ: अनुष्का शर्माचा ‘थ्री इडियट्स’च्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल; व्हिडीओ पाहून आमिर खान थक्क

भिंतीवर दिसली बाजीराव पेशव्यांची आकृती

पुढे या मुलाखतीत तो म्हणाला, ” एक दिवस सेटवर मला मोठा टास्क देण्यात आला होता. हा टास्क उत्तमपणे पार पडावा यासाठी मी प्रार्थना करत होतो. सेटवर तिथेच एक काळ्या रंगाची भिंत होती. या भिंतीवर पांढरी धूळ जमा झाल्याने एक विशिष्ट आकृती तयार झाली होती. तिच पगडी, तेच डोळे, मिश्या अगदी तोच रुबाब..ती हुबेहुब बाजीराव पेशव्यांची आकृती होती.” हा अनुभव सांगताना रणवीर म्हणाला की सेटवर त्याने ही आकृती अनेकांनी दाखवली सुद्धा. यावर अनेकांनी ती आकृती बाजीराव पेशव्यांसारखीच दिसत असल्याचं मान्य केलं होतं.

तर रणवीरला हा अनुभव येण्यापूर्वी तो अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीत आधी विश्वास करत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. मात्र हा अनुभव त्याच्यासाठी खूप खास होता. या आधी बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बिपाशा बासू, इमरान हाश्मी आणि वरुण धनव अशा काही सेलिब्रिटींना शूटिंग दरम्यान अशा प्रकारचे अनेक विचित्र अनुभव आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 11:28 am

Web Title: ranveer singh experience ghost on bajirao mastani set said it was horrible experience kpw 89
Next Stories
1 कपूर कुटुंबीयांनी आईकडे पाठ फिरवली होती, करीना कपूरचा खुलासा
2 ‘केआरके कुत्ता है’ गाण्यावरुन वाद, कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी
3 चुलत बहिण शनाया कपूरला डेब्यूसाठी मदत करणार नाही अर्जुन कपूर
Just Now!
X