News Flash

रेमडेसिवीर नाही तर इथं मिळतय रेमो डिसूझा इंजेक्शन, कोरिओग्राफरने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. रेमो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आता रेमोने एक विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ रेमोने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रेमडेसिवीर या लसीला चुकून रेमो डिसूझा बोलतो. एका मुलाखतीत ती व्यक्ती रेमडेसिवीरच्या जागेवर रेमोच नाव घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘शेवट चुकवू नका’, अशा आशयाचे कॅप्शन रेमोने त्या व्हिडीला दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काही तासातचं हा व्हिडीओ ८ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

आणखी वाचा : “घरातही शर्ट घालूनच राहायचं”, शाहरुख खानची मुलगा आर्यनला ताकीद!

 

करोनाच्या या लढाईत रेमोने अनेक गरजूंना मदत केली आहे. सोशल मीडियाचा वापर करत रेमो त्याच्या चाहत्यांना लस घेण्यास सांगत आहे. करोना पासून स्वत: चे संरक्षण कसे करावे आणि लागु करण्यात आलेल्या निर्बंधाबाबत तो सतत चाहत्यांना सांगत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 5:06 pm

Web Title: remo d souza shares lol video of man mistakenly calling remdesivir as remo dsouza dcp 98
Next Stories
1 मुलांसोबत का राहात नाही? नीतू कपूर यांनी सांगितले कारण
2 “घरातही शर्ट घालूनच राहायचं”, शाहरुख खानची मुलगा आर्यनला ताकीद!
3 सुगंधाने केली लता मंगेशकर यांची मिमिक्री, सांगितलं भोसले कनेक्शन
Just Now!
X