News Flash

“प्लीज माझ्याकडे परत ये…!”; सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची इमोशनल पोस्ट

सुशांतसोबतचा फोटो शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट. म्हणाली, "आता चंद्रावरून तुझ्या दुर्बिणीमधून..."

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट लिहिलीय. गेल्या वर्षी याच दिवशी १४ जून २०२० रोजी सुशांतचा मृत्यू झाला. मुंबईतल्या राहत्या घरी पंख्याला लटकेल्या अवस्थेत सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. ज्यावेळी सुशांत आणि अंकिता या दोघांच्या नात्यात तणाव सुरू होता त्यावेळी रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आली होती. आज सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालं असताना रियाने सुशांतसाठी ही इमोशनल पोस्ट लिहिली आहे.

सुशांतच्या आजच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी एकीकडे अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने अनेक व्हिडीओ शेअर केलेत. तर दुसरीकडे रिया चक्रवर्तीने सुशांतसोबतचा एक फोटो शेअर केलाय. सुशांतची गर्लफ्रेंड रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलंय, “तू या जगात नाहीय, यावर एका क्षणासाठी सुद्धा विश्वास बसत नाहीय. लोकं म्हणतात की वेळ सारं काही सुरळीत करते…पण तुच माझा वेळ आणि सारं काही होतास…मला माहितेय की आता चंद्रावरून तुझ्या दुर्बिणीमधून बघत असशील आणि माझी रक्षा करत असशील. मला इथून घेऊन जाण्यासाठी तु मला भेटायला येशील याची मी प्रत्येक दिवशी वाट पाहतेय. मी तुला प्रत्येक ठिकाणी शोधतेय. प्रत्येक दिवशी मी आतून तुटतेय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही…

यापुढे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती म्हणाली, “मला माहित आहे की तु इथे माझ्यासोबतच आहेस. तु या जगात नाहीस याची जाणीव जेव्हा मला होते तेव्हा माझ्या शरीरात भावनांचा पूर येतो. हे लिहिताना माझ्या मनात वेदना होत आहेत. तुझ्या शिवाय माझं आयुष्य काहीच नाही. जगण्याचा अर्थच तु तुझ्यासोबत घेऊन गेलास. या पोकळीला कधीच भरून काढता येणार नाही. तुझ्याशिवाय मी उभी आहे, माझा लाडका सनशाईन बॉय… मी दररोज तुझ्यासाठी ‘मालपुआ’ बनवून देईल असं वचन देते आणि जगातले सगळेच क्वांटम फिजिक्सचे पुस्तकं वाचतेय. प्लीज माझ्याकडे परत ये…आई मिस यू माय बेस्ट फ्रेंड, माय मॅन, माय लव.”

सुशांतच्या मृत्यू प्रकरणात बऱ्याचदा गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचं नाव समोर आलंय. ती सुशांतसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होती. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदरच रिया त्याच्या घरातून निघून गेली होती. रियावर सुशांतच्या बॅंक अकाउंटमधून १५ कोटी रूपये काढल्याचा आरोप करण्यात येतोय. याशिवाय ड्रग्ज प्रकरणात सुद्धा रियाला कित्येक दिवस कारागृहात रहावं लागलं होतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 9:11 pm

Web Title: rhea chakraborty shares emotional post on sushant singh rajput first death anniversary prp 93
Next Stories
1 सुशांतचं क्रिकेट ‘कनेक्शन’, मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटरला दिलं होतं फलंदाजीचं प्रशिक्षण!
2 छोटे गायक येत आहेत स्वरांनी तुमचं मन जिंकायला, ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्पचं नवं पर्व
3 ‘दर्या किनारी…’ गाण्यावर ‘तारक मेहता…’मधील दयाबेनचा कोळी डान्स व्हायरल, बोल्ड लूक पाहून चाहते थक्क
Just Now!
X