News Flash

संजय दत्तच्या पहिल्या पत्नीचा फोटो पाहून मान्यता म्हणाली…

त्रिशाला दत्तने पोस्ट केला आईचा फोटो

त्रिशाला, संजय दत्त आणि मान्यता (संजयची दुसरी पत्नी) -संग्रहित छायाचित्र

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला इतर स्टार किड्स प्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. मात्र सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. एखाद्या नावाजलेल्या सेलिब्रिटीप्रमाणे तिचे फॉलोअर्स आहेत. अलिकडेच त्रिशालाने इन्स्टाग्रामवर आपल्या आईचा फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या फोटोवर संजय दत्तची बहीण आणि पत्नी मान्यताने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

त्रिशालाच्या आईचं नाव रिचा शर्मा असं होतं. ती संजय दत्तची पहिली पत्नी होती. त्रिशालाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये रिचाच्या कुशीत तान्हुली त्रिशाला दिसत आहे. हा फोटो १९८८मधला असल्याचे म्हटले जात आहे. त्रिशालाचं इन्स्टाग्राम अकाउंट तिनं प्रायव्हेट ठेवलं आहे. परंतु तरी देखील तिने पोस्ट केलेल्या या फोटोचे स्क्रिन शॉट्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

हा फोटो पाहून संजय दत्तची पत्नी मान्यता म्हणाली, “किती सुंदर, त्रिश आता ती स्वर्गातील एक एंजल आहे. जी नेहमी तुला पाहते. ती या जगात तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते. देव तिच्या आत्माला शांती देवो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 1:53 pm

Web Title: richa sharma sanjay dutt manyata dutt trishala dutt mppg 94
Next Stories
1 लॉकडाउनमध्ये सलमानच्या वडिलांना मॉर्निग वॉकसाठी प्रशासनानं दिला पास, कारण…
2 …म्हणून मनोज वाजपेयी ‘लो बजेट’ चित्रपटांना देतो प्राधान्य
3 करण जोहरच्या घरातील ‘टॅलेंटेड म्युजिशियन’;पाहा भन्नाट व्हिडीओ
Just Now!
X