News Flash

‘यापुढे अपमानास्पद कमेंट केली तर…’; ऋषी कपूर ट्रोलर्सवर भडकले

ऋषी कपूर यांनी घेतलाय नवा निर्णय?

ऋषी कपूर

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणारे अभिनेता म्हणजे ऋषी कपूर. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. त्यांचे विचार ते जाहीरपणे आणि उघडपणे मांडतात. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांना टीकेचं धनीदेखील व्हावं लागतं. परंतु या सगळ्याची पर्वा न करता ते बिनधास्तपणे व्यक्त होत असतात. विशेष म्हणजे ट्रोलर्सकडे लक्ष न देणारे ऋषी यावेळी मात्र ट्रोल करणाऱ्यांवर चांगलेच संतापले असून त्यांना सडेतोड शब्दांत सुनावलं आहे.

ऋषी कपूर यांनी अलिकडेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटमधील प्रोफाइल स्टेट्स बदललं. परंतु या नव्या स्टेट्सच्या माध्यमातून त्यांनी ट्रोल करणाऱ्यांचे कानही टोचले आहेत. जर यापुढे ट्रोल केलंत तर ब्लॉक करेन असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.

‘लोकांना एकदा सांगून समजतंय असं वाटतं नाही. जर या पुढे कोणीही माझ्या लाइफस्टाइलवर विनोद केले किंवा अपमानास्पद कमेंट केल्या तर अशा फॉलोअर्सला मी ब्लॉक करेन. त्यामुळे आता कसं वागायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे’, असं ऋषी कपूर म्हणाले.

पाहा : स्मिता पाटील यांच्या सुनेचे ‘हे’ फोटो कदाचित तुम्ही पाहिले नसतील

 दरम्यान, ऋषी कपूर यांनी त्यांचं प्रोफाइल एडिट केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला. विशेष म्हणजे हे स्टेट्स साऱ्यांनी पहावं यासाठी त्यांनी मुद्दाम स्क्रीनशॉट काढल्याचं म्हटलं जातं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 9:47 am

Web Title: rishi kapoor changed his twitter profile status slammed haters trollers ssj 93
Next Stories
1 करोनाचा ‘वंडर वुमन’ला फटका; वर्षातील सर्वात मोठा चित्रपट लांबणीवर
2 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज अभिनेता मंगेश देसाई करणार द.मा. मिरासदार यांच्या कथेचं अभिवाचन
3 गौरी खान लेकीकडून घेते मेकअप टिप्स, फोटो व्हायरल
Just Now!
X