सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘सांगतो ऐका’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यासह भाऊ कदम आणि वैभव मांगले ही विनोदी जोडगोळी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे. दिग्दर्शक सतीश राजवाडेंच्या चित्रपटांनी आजवर प्रेक्षकांच्या मनात चांगले स्थान निर्माण केले आहे. आशय-विषय आणि कलाकार अशा प्रत्येक बाबतीत दर्जेदार असणाऱ्या राजवाडेंच्या चित्रपटांबद्दल नेहमीच उत्सुकता असते. या वेळी मात्र, ‘सांगतो ऐका’च्या निमित्ताने सतीश राजवाडे संपूर्ण वेगळ्या कलाकारांबरोबर दिसणार आहेत. सचिन पिळगावकर आणि सतीश राजवाडे ही जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पडद्यावर येणार आहे. त्याचप्रमाणे भाऊ कदम आणि वैभव मांगले हे दोघेही सचिन यांच्यासोबत पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. भाऊ आणि वैभव या दोघांनाही छोटय़ा पडद्यावरील हास्यविषयक कार्यक्रमातील हुकमाचे एक्के मानले जाते. वैभवने तर चित्रपटांमधूनही आपल्या विनोदी अभिनयाने ठसा उमटवला आहे. आता दोघे मिळून रुपेरी पडद्यावर काय धम्माल करतात हे ‘सांगतो ऐका’मध्ये पाहायला मिळेल. या दोघांबरोबर ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्यासह मिलिंद शिंदे, पूजा सावंत, संस्कृती बालगुडे आदी कलाकारांनीही या चित्रपटात काम केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2014 रोजी प्रकाशित
सचिनसह भाऊ कदम आणि वैभव मांगले म्हणताहेत ‘सांगतो ऐका’!
सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘सांगतो ऐका’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून अभिनेता सचिन पिळगावकर यांच्यासह भाऊ कदम आणि वैभव मांगले ही विनोदी जोडगोळी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहे.
First published on: 28-09-2014 at 05:09 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin bhau kadam and vaibhav mangle says sangto aika