News Flash

..म्हणून ‘पतौडी पॅलेस’मध्ये ‘तांडव’च्या शूटिंगसाठी सैफने दिली परवानगी

याआधी त्याने कोणत्याच चित्रपटाची शूटिंग पतौडी पॅलेसमध्ये होऊ दिली नव्हती.

अभिनेता सैफ अली खानने त्याच्या वडिलोपार्जित पतौडी राजवाड्यात आगामी ‘तांडव’ या वेब सीरिजचं शूटिंग केलं आहे. याआधी त्याने कोणत्याच चित्रपटाची शूटिंग पतौडी पॅलेसमध्ये होऊ दिली नव्हती. मात्र ‘तांडव’ या गोष्टीला अपवाद ठरला. अली अब्बास जफर दिग्दर्शित या सीरिजमध्ये सैफ एका राजकारण्याची भूमिका साकारणार आहे. त्याच्या भूमिकेला मोठी राजकीय पार्श्वभूमी असल्याने राजवाडा दाखवणं सीरिजसाठी गरजेचं होतं.

याविषयी ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “हा राजवाडा वर्षातील ३४० दिवस कोणीच वापरत नसल्याने शूटिंगसाठी काही दिवस देण्यास माझी काही हरकत नव्हती. सध्याच्या घडीला चित्रपटाची टीम की शूटिंगच्या स्थळाविषयी फार जागरूक असते, पण तरी माझ्या मनात थोडी धाकधूक होतीच. राजवाड्याच्या आजूबाजूला त्यांनी शूटिंग केलं असतं तर मी जास्त कम्फर्टेबल असतो. पण तांडवसाठी राजवाड्यात शूटिंग करण्याची मी परवानगी दिली.”

पाहा फोटो : ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिलात का?

तांडव या सीरिजमध्ये सैफसोबतच सुनील ग्रोवर, मोहम्मद झीशान अयुब, डिंपल कपाडिया, सारा जेन दियास, क्रितिका कामरा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ही सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2021 10:47 am

Web Title: saif ali khan allowed tandav shoot inside pataudi palace it still makes me nervous ssv 92
Next Stories
1 रेशीमगाठ! अभिज्ञा-मेहुलच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल
2 काय?? साडी नेसून अदा शर्माची कार्टव्हील उडी; पाहा व्हिडीओ
3 करमणूक कर केला रद्द; ‘या’ राज्यात बजेटपूर्वीच आनंदाचं वातावरण
Just Now!
X