हिंदू संस्कृती आणि काही परंपरा अनेकांना भुरळ घालतात. देशात होणाऱ्या वेगवेगळ्या धार्मिक सोहळ्यांना परदेशी भाविकही हजेरी लावतात. पण हॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री लक्ष्मी देवीच्या भक्तीत लिन झाली आहे.
ही हॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सलमा हायेक. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर समृद्धीची देवता श्री लक्ष्मी हिचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘जेव्हा मी माझ्या अंतरंगातील सौंदर्याकडे पाहते, तेव्हा देवी लक्ष्मीचे नाव घेऊन ध्यानाला सुरुवात करते. लक्ष्मी देवी ही हिंदू धर्मात धन, सौभाग्य, प्रेम, सौंदर्य, माया, सुख आणि समुद्धीची देवी आहे. देवी लक्ष्मीचं रुप मला आनंद देतं आणि हाच आनंद आंतरिक सौंदर्याचा मार्ग आहे’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
सलमाने शेअर केलेल्या या फोटोमुळे सध्या ती चर्चेत आहेत. तिच्या पोस्टला १ लाख लाइक्स मिळाले असून अनेकजण त्यावर कमेंट करत आहेत.
यापूर्वी हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच हॉलिवूड अभिनेत्री मायली सायरस आणि ज्युलिया रॉबर्ट्स या देखील हिंदु धर्माकडे आकर्षित झाल्या आहेत. आता अभिनेत्री सलमा ही देवी लक्ष्मीची पूजा करत असल्याचे समोर आले आहे.