News Flash

..अन् प्रभूदेवासोबत थिरकली सलमानची पावले

सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

सलमान खान आणि प्रभूदेवा

सध्या सलमान खान त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. दरम्यान बॉलिवूडचा दबंग खान सलमान त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांची मने जिंकत असतो. आता देखील सलमानने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान प्रभूदेवासह नाचताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान सुदीप, निर्माता साजिद नाडियाडवाला आणि प्रभू देवा ‘उर्वशी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. सलमानचा डान्स आणि त्या तिघांचे हावभाव पाहून चेहऱ्यावर हास्यच उमटते. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसह सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत दिसणार असून अरबाज खान आणि दाक्षिणात्य अभिनेता सुदीप देखील झळकणार आहेत. ‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येईल अशी चर्चा आहे तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र सलमाननं याबद्दल बोलण्यास नकार दिला आहे.

सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सलमान व कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. सलमानचे ‘ट्यूबलाइट’, ‘रेस ३’ हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. त्यामुळे ‘भारत’च्या यशाने त्याला दिलासा मिळाला आहे. ‘दबंग 3’ कडूनदेखील सलमानला खूप आशा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 1:02 pm

Web Title: salman khan dance on prabhu deva song urvashi avb 95
Next Stories
1 ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये मिळणार या पाच प्रश्नांची उत्तरं
2 ‘सिटी ऑफ ड्रिम्स’नंतर प्रियाची नवी वेब सीरिज , उमेशसोबत करणार स्क्रीन शेअर
3 परदेशी प्रेक्षकांनाही ‘कबीर सिंग’ची भुरळ; ऑस्ट्रेलियात ‘उरी’लाही टाकलं मागे
Just Now!
X