News Flash

‘टायगर सीरिज’च्या तिसऱ्या चित्रपटासाठी सलमान-कबीर खान करणार एकत्र काम?

'एक था टाइगर', 'बजरंगी भाईजान', 'ट्यूबलाइट' अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘एक था टाइगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘ट्यूबलाइट’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता टायगर सीरिजच्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या सांगण्यावरुन सलमान आणि कबीर खान पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार टायगर सीरिजमधील हा चित्रपट अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

Our third journey together comes to an end… Now I can’t wait To show it to the world @beingsalmankhan #tubelight #eid2017

A post shared by Kabir Khan (@kabirkhankk) on

टायगर सीरिजमधील पहिला चित्रपट ‘एक था टायगर’ २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. त्यानंतर टायगर सीरिजमधील दुसरा चित्रपट ‘टायगर जिंदा है’चे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते. हा चित्रपट २०१७मध्ये प्रदर्शित झाला होता. आता लवकरच या सीरिजमधील तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहते आनंदी असल्याचे पाहायला मिळते.

नुकताच कबीर खान आणि सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच हा चित्रपट आजही जपानमधील काही चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येत आहे असे कबीरने पोस्टमध्ये म्हटले होते.

लवकरच सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करोना व्हायरसमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सलमानने चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे. या चित्रपटात दिशा पटाणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

तर कबीर खानचा ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच या चित्रपटात रणवीर सिंह आणि दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 3:20 pm

Web Title: salman khan to team up with kabir khan for third installment of tiger franchise avb 95
Next Stories
1 ‘बॉलिवूडवर चर्चा करुन आपली दिशाभूल केली जातेय’; संगीतकाराने साधला सरकारवर निशाणा
2 रितेश-जेनेलियाचं व्यवसाय क्षेत्रात पदार्पण; प्लान्ट बेस्ड मीट प्रॉडक्शन करणार लाँच
3 ‘काश्मीरियत’ शॉर्ट फिल्मचा फर्स्ट लूक प्रदर्शित!
Just Now!
X