सलमान खानच्या ‘किक’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर १७८.२८ कोटींची तगडी कमाई केली आहे. रमजानच्या दिवसांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच ८० कोटींची कमाई केली होती. त्यानंतर ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट कमाईचे नवे उच्चांक प्रस्थापित करेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र, ‘किक’ने ईदपूर्वीच १०० कोटींच्या कमाईचा आकडा पार केला होता. पाकिस्तानमध्येही या चित्रपटाने सुट्टीच्या दिवसांतील चित्रपटांच्या कमाईचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या दिवसांत ‘किक’ची मजल कुठवर जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2014 रोजी प्रकाशित
सलमानच्या ‘किक’ची १७८.२८ कोटींची कमाई!
सलमान खानच्या 'किक' या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर १७८.२८ कोटींची तगडी कमाई केली आहे.

First published on: 02-08-2014 at 06:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khans kick collects rs 178 28 crore in first week