News Flash

सलमान खानच्या पोस्टवर संगीता बिजलानीची कमेंट; चाहते म्हणाले “भाभीजान”

सोशल मीडियावर चर्चा

9 मे म्हणजेच मदर्स डेच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आईसोबतचे फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने रात्री उशीरा सोशल मीडियावरून चाहत्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सलमानने आई सलमा आणि सावत्र आई हेलन या दोघींचे फोटो शेअर करत चाहत्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

सलमानने आधी आई सलमाचा साडीतील फोटो शेअर केलाय. तर नंतर हेलन यांचा फोटो शेअर केलाय. या दोन्ही फोटोला त्याने “हॅपी मदर्स डे..सुरक्षित रहा” असं कॅप्शन दिलंय. मात्र या दोन्ही पोस्ट सध्या चर्चेत आहेत. याच कारण म्हणजे या फोटोवरील सलमानची एक्स गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री संगीता बिजलानीच्या कमेंटमुळे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने शेअर केलेल्या सलमा यांच्या फोटोच्या कमेंट बॉक्समध्ये संगीता बिजलानीने “मॉम” म्हणजेच आई अशी कमेंट केलीय. तर हेलन यांच्या फोटोवरही हार्टचे इमोजी देत कमेंट केलीय. संगीता बिजलानीच्या या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘सासूबाई’ तर दुसरा युजर म्हणालाय, ” भाभीजान”. संगीता बिजलानीच्या या कमेंटने नेटकऱ्य़ांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

salman-khan (photo-instagram@beingsalmankhan)

90 च्या दशकात अभिनेता सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या प्रेमप्रकरणाती चांगलीच चर्चा होती. दोघे अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. संगीता आणि सलमानचं प्रेम प्रकरण लग्नापर्यंत जाऊन पोहोचलं होतं. संगीता बिजलानी आणि सलमान खान लग्न करणार अशी १९९४ साली चर्चा होती. पण अचानक हे लग्न रद्द झालं

त्यानंतर संगीता बिजलानीचं नाव भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनसोबत जोडलं गेलं. दोघांच्या अफेअरची त्यावेळी मीडियामध्ये बरीच चर्चा झाली.अझरने त्याची पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला. त्यानंतर १९९८ साली अझर आणि संगीता बिजलानीने लग्न केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:50 pm

Web Title: sangeeta bijlani comment on salman khans mothers day post call mom to salma khan kpw 89
Next Stories
1 ‘तारक मेहता..’मधील ‘या’ अभिनेत्याने मुलाच्या उपचारासाठी विकली अगरबत्ती आणि वर्तमानपत्रे
2 ऐश्वर्य ठाकरे आणि लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर पूजा बेदीचे वक्तव्य, म्हणाली…
3 ‘केवळ सरकारला दोष देण्याऐवजी…’, जेठालालने केले चाहत्यांना आवाहन
Just Now!
X